जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मध्यरात्री चालकाशिवाय सुरु झाली रिक्षा, Video धडकी भरवणारा

मध्यरात्री चालकाशिवाय सुरु झाली रिक्षा, Video धडकी भरवणारा

व्हायरल

व्हायरल

सोशल मीडिया हे मनोरंजनाचं साधन झालं आहे. लोक आपला अधिक वेळ इकडेच घालवताना दिसतात. लोकांना सोशल मीडियाची इतकी सवय झाली आहे की, आपण पाहिलेली, ऐकलेली गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर करतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 एप्रिल : सोशल मीडिया हे मनोरंजनाचं साधन झालं आहे. लोक आपला अधिक वेळ इकडेच घालवताना दिसतात. लोकांना सोशल मीडियाची इतकी सवय झाली आहे की, आपण पाहिलेली, ऐकलेली गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर करतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, हटके, धोकादायक, भीतीदायक घटना समोर येतात. काहींचे फोटो व्हिडीओही सोशल मीडियवर व्हायरल होतात. अशातच एक भीतीदायक व्हायरल व्हिडीओ समोर आलाय. जो पाहून तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. समोर आलेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मध्यरात्री रिकाम्या रस्त्यावर एक रिक्षा आहे. अचानक ही रिक्षा विनाचालकाशिवाय रस्त्यावर गोल गोल फिरु लागते. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. भररात्री चालकाशिवास रिक्षा सुरु झाल्याने पाहणारे लोकही घाबरुन गेले आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

mdbilal904 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदाच्या व्हिडीओने अनेकांची घाबरगुंडी उडवली आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंटचा पाऊस होताना दिसतोय. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून घाबरल्याचं सांगितलं आहे तर काहींनी कोणत्या तरी युक्तीने रिक्षा सुरु केल्याचं म्हटलं आहे.

जाहिरात

दरम्यान, यापूर्वीही अशा बऱ्याच घटना समोर आल्यात ज्यामध्ये गाडी, कार, रिक्षा आपोआप सुरु झाल्या. यामुळे अनेकांची भूत असल्याची समजूत होते. मात्र तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगाने बरीच प्रगती केली असून टेस्ला कंपनीकडे ड्रायव्हर नसलेल्या कार आहेत ज्या ड्रायव्हरशिवायही चालवता येतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात