जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आईचं प्रेम! खड्ड्यात अडकलेल्या बछड्यांना वाचवण्यासाठी सिंहिणीची धडपड, भावुक करणारा VIDEO

आईचं प्रेम! खड्ड्यात अडकलेल्या बछड्यांना वाचवण्यासाठी सिंहिणीची धडपड, भावुक करणारा VIDEO

आईचं प्रेम! खड्ड्यात अडकलेल्या बछड्यांना वाचवण्यासाठी सिंहिणीची धडपड, भावुक करणारा VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Lioness Viral Video) तुम्ही पाहू शकता की सिंहिण आणि तिचे दोन बछडे नदीच्या काठावर उभा आहेत. हे बछडे अतिशय छोटे आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 28 फेब्रुवारी : सोशल मीडियावर अनेक असे व्हिडिओ व्हायरल होत असतात जे आपल्या मनाला स्पर्श करून जातात. मात्र जेव्हा एखाद्या आईचा भावनिक करणारा व्हिडिओ (Emotional Video of Mother) समोर येतो, तेव्हा नकळतपणे सगळ्यांच्याच डोळ्यातून पाणी येतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही नक्कीच भावुक व्हाल. हा व्हिडिओ एका सिंहिणीचा आहे, जी आपल्या बछड्यांना अडचणीत पाहून लगेचच त्यांच्याजवळ मदतीसाठी पोहोचली. साप आणि विंचू एकत्र शिजवून तयार केली जाते ही डिश, पाहा या Danger पदार्थाचा VIDEO व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Lioness Viral Video) तुम्ही पाहू शकता की सिंहिण आणि तिचे दोन बछडे नदीच्या काठावर उभा आहेत. हे बछडे अतिशय छोटे आहेत. त्यामुळे ते एका खड्ड्यातून वरती येण्यात अपयशी ठरत आहेत. अशात जेव्हा सिंहिणीची नजर आपल्या पिल्लांवर जाते तेव्हा ती अजिबातही उशीर न करता बछड्यांच्या मदतीसाठी खाली उतरते आणि त्यांना आपल्या जबड्यात पकडून वरती चढवते. एका आईची आपल्या मुलांसाठी सुरू असलेली ही धडपड पाहून नेटकऱ्यांना आपल्या आईची आठवण येत आहे.

जाहिरात

हा भावनिक व्हिडिओ इंडियन फॉरेस्ट अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 39 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला सुंदर कॅप्शनही देण्यात आलं आहे. व्हिडिओवर लोक निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. रूसलेल्या नवरीला मनवण्यासाठी नवरदेवाच्या मित्रांनी केलं मन जिंकणारं काम, VIDEO सोशल मीडियावर आई आणि पिल्लांमधील या बॉन्डिंगला मोठी पसंती मिळत आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, आई आईच असते, जी स्वतः काहीही सहन करू शकते. मात्र मुलांसाठी प्रत्येक गोष्ट त्याग करते. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, मनाला स्पर्शून जाणारा व्हिडिओ, एक आई अशीही असते. लव्ह यू आई. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात