मुंबई, 12 एप्रिल : सध्या देशभरात कोरोना व्हायरस वेगानं पसरत आहे. वारंवार सांगूनही अजूनही लॉकडाऊन आणि स्वच्छतेचं गांभीर्य नागरिकांना न ओळखल्यानं रोज 500 हून अधिक नवीन रुग्णांना कोरोनाची लागण होत आहे. आतापर्यंत 8 हजारहून लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हात स्वच्छ 20 सेकंद धुवायला हवेत. हात स्वच्छ धुण्याबाबत अनेकवेळा प्रशासन, आरोग्य विभाग, सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या स्तरातून आवाहन केलं जात आहे. सोशल मीडियावर 20 सेकंद हात धुण्याचं चॅलेंजही देण्यात आलं होतं. आता सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. Raccoon नावाच्या प्राण्यानं हात कसे धुवायचे हे सांगितलं आहे. हात तर सगळेच धुवतात पण ते धुवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी योग्य पद्धतीनं हात धुतले तर आपण निरोगी राहू. Raccoon नावाच्या या प्राण्याचा मजेशीर टीकटॉक व्हिडीओ IFS ऑफिसर प्रवीण कासवान यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. हा प्राणी कसा हात धुवत आहे नीट पाहा. हात कसे धुवायचे याचं प्रात्यक्षिक हा करून दाखवत आहे.
Everybody must wash their hands carefully. Second Demo by the Raccoon🦝 . Watch carefully. TikTok video. pic.twitter.com/JJpzfU7YDB
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) April 10, 2020
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 504 रिट्वीट 45 कमेट्स आल्या आहेत. एका युझरनं दुसरा Raccoon स्वच्छ हात धुणाऱ्या प्राण्यासाठी टाळ्या वाजवत आहे. हे वाचा- वृद्धाच्या अंत्यसंस्काराला लोकांची गर्दी, कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टनंतर खळबळ
So cute ! Appropriate to current scenario! Nature teaches us lot.... it’s just we who if ignore!
— CJ (@Chintanjoshi13C) April 10, 2020
या 15 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक रॅकून आपले हात नीट धुताना दिसत आहे. रॅकून प्रथम पाण्याने भरलेल्या भांड्यात हात ठेवतो. आणि मग साबणाच्या पाण्यात हात बुडवून चोळतो आणि शेवटी, रॅकूनने पुन्हा पाण्याने आपले हात धुले. हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर लवकरच व्हायरल झाला, 17k पेक्षा जास्त युझर्सनी पाहिला आहे. संपादन- क्रांती कानेटकर. हे वाचा- लॉकडाऊन तर वाढवला पण अर्थव्यवस्थेला स्थिर करण्यासाठी सरकारचं ‘हे’ आहे प्लानिंग