मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अजबच! म्हणे, 'हाच माझा नवरा'; आजीबाईने चक्क गाईशीच बांधली लग्नगाठ कारण...

अजबच! म्हणे, 'हाच माझा नवरा'; आजीबाईने चक्क गाईशीच बांधली लग्नगाठ कारण...

पतीच्या निधनानंतर वृद्ध महिलेने गायीशी लग्न करून थाटला संसार

पतीच्या निधनानंतर वृद्ध महिलेने गायीशी लग्न करून थाटला संसार

पतीच्या निधनानंतर वृद्ध महिलेने गायीशी लग्न करून थाटला संसार

  • Published by:  Priya Lad

नोम पेन्ह, 27 नोव्हेंबर :  गाय जिला आपण गोमाता मानतो. पण याच गाईला एका महिलेनं आपला नवरा मानलं आहे. फक्त नवरा मानलं नाही तर चक्क गायीशी तिने लग्नही केलं आहे (Woman Marry Cow). प्राण्याच्या रुपात आपल्या नवऱ्याचा पुनर्जन्म झाला आहे  (Woman Thinks Cow Reincarnation of Dead Husband) असा दावा या महिलेने केला आहे. तिने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

भारतासह जगातील अनेक देशांमध्ये पुनर्जन्म (Reincarnation)  मानला जातो. माणूस मृत्यूनंतर पुन्हा जन्म घेतो असं म्हटलं जातं. हा विज्ञान आणि आस्थेचा मुद्दा चर्चेता विषय आहे पण जगातील बहुतेक लोक हे खरं मानतात. कंबोडियातील हा महिलेने (Combodia Woman) तर चक्क गायीलाच आपल्या नवऱ्याचा पुनर्जजन्म मानून तिच्याशी लग्न केलं आहे (Combodia Woman Marry Cow).

कंबोडियाच्या (Cambodia)  क्राटी (Kratie) प्रांतात राहणारी 74 वर्षांची खिम हँग (Khim Hang). तिचा नवरा या जगात नाही. त्यानंतर तिच्या घरी एका गायीचा जन्म झाला. तिच्या नवऱ्यामध्ये असलेले सर्व गुण या गायीत असल्याचं म्हणत तिने  गायीच्या रुपात तिच्या नवऱ्याचा जन्म झाला आहे, असा दावा केला आहे.

हे वाचा - काय म्हणावं याला! हटके प्रपोज करण्याच्या नादात तरुणाने Private part ची लावली वाट

जेव्हा गायीचा जन्म झाला तेव्हा महिला तिच्यासोबत खूप वेळ घालवायची. त्यावेळी गाय तिचा हात, चेहरा चाटायची. किती तरी वेळा ती तिच्या तोंडावर किससुद्धा द्यायची. खिमने सांगितलं, की जसा तिचा नवरा तिच्या प्रेम व्यक्त करायचा तशीच ही गायसुद्धा करते. त्यामुळे आपला नवराच परत आला आहे, असं तिला वाटतं.

त्यामुळे तिने गायीशी लग्न केलं. द सन वेबसाईच्या रिपोर्टनुसार या महिलेने गायीशी लग्न केल्याचा कोणता व्हिडीओ तर नाही पण गावातील बहुतेक लोक हे लग्न पाहिलं असल्याचा, या लग्नात सहभागी झाल्याचा दावा करतात.

हे वाचा - Body Builder ने केलं चक्क बाहुलीशी लग्न; हनीमूनही केला एन्जॉय; पाहा VIDEO

महिला आता गायीला नवरा समजून तिच्यावर प्रेम करते. ही गाय गोठ्यात नाही तर तिच्या घऱात तिच्यासोबत राहते. तिने तिला आपल्या नवऱ्याची उशीसुद्धा दिली आहे. तिने आपल्या मुलांनाही गायीची वडील म्हणून सेवा करण्यास सांगितलं. आता तर तिची मुलंही हेच आपले वडील आहेत असं मानतात आणि तिची सेवा करतात. आपल्या मृत्यूनंतर गायीला आपल्या वडीलांप्रमाणे प्रेम द्या, तिला कधीच विकू नका. चांगलं खायला द्या. तिचा मृत्यू झाल्यानंतरही माणसांप्रमाणे तिचे अंत्यसंस्कार करा, असं तिने आपल्या मुलांना सांगून ठेवलं आहे.

First published:

Tags: Lifestyle, Marriage, Viral, Wedding