मुंबई, 29 नोव्हेंबर : आकाशात उंच उंच जाणारा झोपाळा (Swing video)… लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आकाशपाळणा दिसला की त्यात बसण्याचा मोह आवरत नाही. पण जेव्हा या आकाशात बसून उंचावर जातो आणि पुन्हा खाली येतो तेव्हा मात्र पोटात गोळा येतो. आकाशपाळण्यात बसलेलं असताना आणि सर्व सुरक्षा असतानाही आपली अशी अवस्था होते. पण एका व्यक्तीने मात्र गरागरा फिरणाऱ्या अशाच झोपाळ्यावर उभं राहून खतरनाक स्टंट करून दाखवले आहेत (Stunt on Swing video). झोपाळ्यावरील स्टंटचा हा व्हिडीओ (Swing stunt video) पाहून अंगावर अक्षरशः काटा येईल. काळजाचा ठोका चुकवणारा असा हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर (Social media) हा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. हा झोपाळा आपण एरवी झोपत असलेल्या झोपाळ्यापेक्षा थोडा वेगळा आहे. यात बसण्यासाठी कुठेच जागा नाही आहे. या व्यक्तीने आपले स्टंट दाखवण्यासाठी हा खास झोपाळा तयार केला आहे.
व्हिडीओत पाहू शकता या झोपाळ्यावर असलेल्या एका मोठ्या रिंगवर एक व्यक्ती उभी आहे. झोपाळा खाली वर गरगर फिरतो आहे, तशी ती रिंग फिरते आणि या रिंगवर उभी असलेली व्यक्ती त्यावर बिनधास्तपणे चालताना दिसते आहे. त्याच्या हातात एक दोरीसुद्धा आहे. जी तो हातात फिरवताना दिसतो आहे. हे वाचा - विमानाच्या आत नाही तर बाहेर बसून अडीच तासांचा प्रवास; आता अशी झाली अवस्था हा व्हिडीओ कुठला आहे, कधीचा आहे आणि ही व्यक्ती कोण आहे याबाबत माहिती नाही. beautiffulgram इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.