नवी दिल्ली 01 जानेवारी : वारूळ मोडलं म्हणून लहानग्या मुंग्यांनी हत्तीला पळवून लावल्याची गोष्ट तुम्ही लहानपणी कदाचित ऐकलेली असेल. आता मात्र, हत्तींनी जंगलाच्या राजाला पळवून लावल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. तो आपल्या प्राणघातक शिकार कौशल्यासाठी ओळखला जातो. जंगलात सिंहाची डरकाळी ऐकून इतर सर्व प्राणी घाबरतात. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत याच्या उलट होताना दिसत आहेत. अवाढव्य हत्तींचा कळप बघून सिंह आपल्या कुटुंबाला घेऊन पळ काढताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सिंहांचा एक कळप जंगलात एकत्र बसलेला दिसतो. त्यांना हत्तींचा एक कळप आपल्या दिशेनं येत असल्याचं दिसतं. या कळपाला बघून अगोदर सिंहाची बछडी जागेवरून उठून पळतात. त्यांच्या पाठोपाठ सिंहीणही तिथून पळू लागते. कुटुंबाचा प्रमुख असलेला सिंह सर्वांत शेवटी तिथे थांबतो. पण, हत्तींचा कळप एकदम जवळ येताच तोदेखील तिथून धूम ठोकतो. घराच्या अंगणातच सिंहिणीचा पाळीव श्वानावर हल्ला; दुसरा कुत्रा बचावासाठी आला अन्…, Shocking Video या आठवड्याच्या सुरुवातीला लान्स नावाच्या युजरनं ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला होता. तेव्हापासून त्याला 14 लाखांहून अधिक व्ह्युज आणि जवळपास 40 हजार लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या अकाउंटवरून पुन्हा शेअर केला आहे.
@BornAKang या युजरनं ट्विटरवर हा व्हिडिओ पुन्हा शेअर केला आहे. ‘मला आश्चर्य वाटलं की सिंहांचा एक कळप असा कसा पळून जाऊ शकतो,’ असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. इंटरनेट युजर्सनी या व्हिडिओवर कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, ‘जंगलाचा खरा राजा हत्ती आहे!’ दुसर्या युजरनं लिहिलं आहे की, ‘मी पहिल्यांदा बघितलं की तो जागेवरून हलण्यास तयार नव्हता. पण, नंतर त्याचा विचार बदलला.’ आणखी एका युजरनं कमेंट केली की, ‘त्या सिंहांनी ज्या प्रकारे उठून पळायला सुरुवात केली ते धक्कादायक होते.’ 3 सिंहिणींनी मगरीला घेरुन अचानक केला हल्ला, पण..; शेवटी कोण जिंकलं? पाहा VIDEO सिंह-सिंहणीनं मिळून एखाद्या हत्तीची शिकार केल्याचं या पूर्वी अनेकांनी बघितलं होतं. मात्र, हत्तींच्या कळपाला बघून सिंहानं पळ काढल्याचं पहिल्यांदाच दिसत आहे. त्यामुळे अनेकांना या व्हिडिओबाबत आश्चर्य वाटत आहे. सिंह आपल्या स्वभावाच्या विरुद्ध कसा वागू शकतो? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. अर्थात जंगलात अनेक घटना घडत असतील आपल्याला लोककथांच्या माध्यमातून या घटना माहिती असतात प्रत्यक्षात काय घडतं हे आता छुपे कॅमेरे आपल्याला ज्ञात करून देत आहेत.