जाहिरात
मराठी बातम्या / Viral / जेव्हा कुत्र्यांसमोर जंगलाचा राजा बनला 'भीगी बिल्ली'; सिंहाने घाबरून ठोकली धूम, पाहा VIDEO

जेव्हा कुत्र्यांसमोर जंगलाचा राजा बनला 'भीगी बिल्ली'; सिंहाने घाबरून ठोकली धूम, पाहा VIDEO

जेव्हा कुत्र्यांसमोर जंगलाचा राजा बनला 'भीगी बिल्ली'; सिंहाने घाबरून ठोकली धूम, पाहा VIDEO

एक सिंह रात्रीच्या अंधारात भक्षाच्या शोधात गावात शिरताना दिसत आहे. यादरम्यान गावातील भटके कुत्रे सिंहावर हल्ला करतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 23 मार्च : ‘अपनी गली में कुत्ता भी शेर होता है’ ही म्हण आपण सर्वांनी ऐकली असेलच. ज्याचा अर्थ सोप्या भाषेत असा होतो की आपल्या क्षेत्रात असलं की दुर्बल देखील बलवानांवर विजय मिळवतात. सध्या एक व्हिडिओ वणव्यासारखा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ही म्हण खरी ठरताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये रस्त्यावरील काही भटके कुत्रे सिंहावर मात करताना दिसत आहेत. जे पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले. सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं, ज्याच्या सामर्थ्यासमोर मोठा शिकारी प्राणीही टिकू शकत नाही. वाघ, चित्ता आणि बिबट्यासारखे जंगलातील भयानक शिकारी प्राणी सिंहाला येताना पाहून आपला मार्ग बदलतात. अशा परिस्थितीत कुत्र्यासमोर आपला जीव वाचवून पळून जाणाऱ्या सिंहाला पाहणं हे कोणासाठीही आश्चर्यकारक असेलच. व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुजरातमधील गीर सोमनाथ गावचा असल्याचं सांगितलं जात आहे. लिंकवर क्लिक करून पाहा VIDEO आतापर्यंत गुजरातमधून सिंहांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये सिंह मानवी वस्तीच्या अगदी जवळ आराम करताना दिसतात. त्याचबरोबर अनेकवेळा ते भक्षाच्या शोधात गावात शिरतानाही दिसतात. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक सिंह रात्रीच्या अंधारात भक्षाच्या शोधात गावात शिरताना दिसत आहे. यादरम्यान गावातील भटके कुत्रे सिंहावर हल्ला करतात. कुत्र्यांचा आवाज आणि हल्ला पाहून सिंहाला तिथून पळून जाणंच योग्य वाटतं.

News18लोकमत
News18लोकमत

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर युजर्सचं लक्ष वेधून घेत आहे. जो सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ भंडार नावाच्या चॅनलवरून यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे. त्याचवेळी, सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर शेअर होत असलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स हैराण झाले आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना यूजर्स सिंहाची खिल्ली उडवत आहेत. काहींनी मजेशीर कमेंट करत म्हटलं ‘क्या शेर बनेगा रे तू.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात