मराठी बातम्या /बातम्या /Viral /त्या प्राण्याला बघताच जंगलाच्या राजाची हवा टाईट; घाबरून झाडावर चढला सिंह, पाहा VIDEO

त्या प्राण्याला बघताच जंगलाच्या राजाची हवा टाईट; घाबरून झाडावर चढला सिंह, पाहा VIDEO

शिकार करण्यासाठी घात घालून बसलेले सिंह अचानक घाबरून पळताना दिसत आहेत. काही तर जीव वाचवण्यासाठी झाडावरही चढले. आता हे वाचून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की जंगलाचा राजा इतकं कोणाला घाबरला?

शिकार करण्यासाठी घात घालून बसलेले सिंह अचानक घाबरून पळताना दिसत आहेत. काही तर जीव वाचवण्यासाठी झाडावरही चढले. आता हे वाचून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की जंगलाचा राजा इतकं कोणाला घाबरला?

शिकार करण्यासाठी घात घालून बसलेले सिंह अचानक घाबरून पळताना दिसत आहेत. काही तर जीव वाचवण्यासाठी झाडावरही चढले. आता हे वाचून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की जंगलाचा राजा इतकं कोणाला घाबरला?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 22 फेब्रुवारी : खरं तर सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. त्याच्या गर्जनेनं संपूर्ण जंगल हादरू लागतं. तो एकटा मोठ्या प्राण्यांची शिकार करतो आणि निर्भयपणे सर्वांचा सामना करतो. सिंह जेव्हा शिकार करायला जातो तेव्हा सगळे प्राणी लपून बसतात. पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शिकार करण्यासाठी घात घालून बसलेले सिंह अचानक घाबरून पळताना दिसत आहेत. काही तर जीव वाचवण्यासाठी झाडावरही चढले. आता हे वाचून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की जंगलाचा राजा इतकं कोणाला घाबरला?

बलाढ्य मगरीचा आपल्याच साथीदारावर जबर हल्ला; VIDEO चा शेवट पाहून उडेल थरकाप

हा व्हिडिओ YouTube वर MalaMalaGameReserve या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, की सिंहांना एक म्हैस दिसते. त्यांना वाटतं की आज शिकार करण्याची चांगली संधी आहे. ते घात घालून हल्ल्याची तयारी करतात. दरम्यान, म्हशींचा कळप येतो आणि सिंहांना संधी न देता त्यांच्यावरच हल्ला करतो. सुरुवातीला सिंह लढण्याचा प्रयत्न करतात, परंतु जेव्हा त्यांना समजतं की हा सामना करणं सोपं नाही, तेव्हा ते पळून जातात.

" isDesktop="true" id="835580" >

जीव वाचवण्यासाठी ते पळताना दिसतात. सिंहाला झाडावर चढून जीव वाचवावा लागतो. सिंह म्हशीच्या भीतीने झाडावरुन उतरण्याची शेवटपर्यंत हिंमत करत नाही. म्हैसही ताकदीने सिंहापेक्षा कमी नसते. सिंह कोणत्याही प्राण्याची अगदी सहज शिकार करताना दिसतो. त्याप्रमाणेच म्हैसही कळपातच राहते. सिंह अगदी सहज म्हशीची शिकार करेल, असं आपल्याला वाटतं. मात्र प्रत्यक्षात तसं होत नाही. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल, जंगलात एकच नियम आहे, जो सगळ्यात जास्त ताकदवर आहे, त्याचाच विजय होतो.

अक्षरश: लचके तोडले, भटक्या कुत्र्यांनी 4 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव; धक्कादायक Video

हा व्हिडिओ 4.7 लाखहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शेकडो लोकांनी लाइक केला आहे. याआधी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता.त्यातही सिंहांचा कळप शिकार करण्यासाठी म्हशीच्या मागे लागलेला दिसतो. सिंह म्हशीला खाली पाडण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर संतप्त झालेल्या म्हशीने सिंहाच्या कळपावर हल्ला केला आणि हे पाहून सिंहांनीच तिथून पळ काढला. शिकार समोर असतानाही तिच्यावर हल्ला करण्याची सिंहाची हिंमत झाली नाही.

First published:
top videos

    Tags: Shocking viral video, Wild animal