जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बलाढ्य मगरीचा आपल्याच साथीदारावर जबर हल्ला; VIDEO चा शेवट पाहून उडेल थरकाप

बलाढ्य मगरीचा आपल्याच साथीदारावर जबर हल्ला; VIDEO चा शेवट पाहून उडेल थरकाप

बलाढ्य मगरीचा आपल्याच साथीदारावर जबर हल्ला; VIDEO चा शेवट पाहून उडेल थरकाप

तुम्ही कधी मगरीला आपल्याच साथीदाराची म्हणजेच दुसऱ्या मगरीची शिकार करताना पाहिलं आहे का? कदाचित नाही, पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 22 फेब्रुवारी : मगर किती क्रूर प्राणी आहे, याचा अंदाज अनेकदा लोकांना नसतो. तुम्ही अनेकदा मगरीचे व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील. बर्‍याच व्हिडिओंमध्ये तुम्ही मगरीला इतर प्राण्यांची शिकार करतानाही पाहिलं असेल, पण तुम्ही कधी मगरीला आपल्याच साथीदाराची म्हणजेच दुसऱ्या मगरीची शिकार करताना पाहिलं आहे का? कदाचित नाही, पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे भयानक दृश्य पाहायला मिळत आहे. अक्षरश: लचके तोडले, भटक्या कुत्र्यांनी 4 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव; धक्कादायक Video मगरीच्या या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या व्हिडिओमध्ये एक मगरच दुसऱ्या मगरीवर हल्ला करताना दिसते. इन्स्टाग्राम अकाऊंट @natureslethal वरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या अकाऊंटवरुन अनेकदा प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ पोस्ट केले जातात. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक तलाव पाहायला मिळतो. आजूबाजूला उंच झाडं आहेत. या तलावामध्ये एक मोठी मगर दिसते, तर दुसरी मगरही तलावामध्ये उलटी पडलेली दिसते.

जाहिरात

पहिल्यांदा पाहताना हे दृश्य नेमकं काय आहे, हे तुम्हाला समजणार नाही. मात्र काही वेळातच यातील एक मगर दुसऱ्या मगरीला जबड्यात पकडताना दिसते. यात मगर दुसऱ्या मगरीचं डोकं धडावेगळं करते. ही मगर ज्या पद्धतीने दुसऱ्या मगरीची शिकार करते, ते पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. ही मगर आपल्या शिकारीचं शिर धडावेगळं करते आणि यानंतर तिला पकडून पाण्यातच गोल फिरवते. या हल्ल्यात दुसऱ्या मगरीचा मृत्यू झाला असणार हे निश्चित. बिबट्याचा कुत्र्यावर जीवघेणा हल्ला, थोडक्यात बचावला जीव, CCTV Video व्हायरल झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. एकाने या व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, की यालाच म्हणतात, जो सगळ्यात फीट असतो, तोच जिवंत राहातो. दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, हे पण माणसांसारखेच आहेत, एकमेकांचा जीव घेण्यासाठी उतावळे झाले आहेत. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एकंदरीतच हा व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधत असून चांगलाच व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात