मुंबई, 02 ऑक्टोबर : लहान मुलांना (Children) नवनवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात. मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. त्यामुळे अनेकदा काहीतरी विचित्र करण्याच्या तयारीत असलेल्या मुलांच्या चिंतेने पालकांचा (Parents and children) जीव मात्र टांगणीला लागलेला असतो. एका मुलाने तर चक्क आपल्या वडिलांवर भलताच प्रयोग करून पाहिला आहे (Son experiment on father video). त्यामुळे ते तर स्वतः आपला जीव मुठीत धरून राहिले होते (Son doing egg drop trick on father’s forhead). सोशल मीडियावर (Social media) बापलेकाचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे (Son father video). ज्यात 7 वर्षांच्या मुलाने आपल्या वडिलांवर एक एक्सपरिमेंट केल्याचं दिसतं आहे. मुलाने आपल्या वडिलांवर एग ड्रॉप ट्रिक (Egg drop trick) आजमावून पाहिली. ज्याचा परिणाम पाहून थोडा धक्का बसेल आणि थोडं हसू येईल. नेमकं असं या मुलाने आपल्या वडिलांसोबत काय केलं ते तुम्हीच पाहा.
WATCH: 7-year-old performs egg drop trick on his dad’s forehead! https://t.co/EwNfG4WPju pic.twitter.com/lmUWyazf4I
— Good Morning America (@GMA) September 30, 2021
व्हिडीओत पाहू शकता वडील जमिनीवर आडवे झोपले आहेत. मुलगा त्यांच्या डोक्यावर पाण्याने भरलेला एक ग्लास ठेवतो. त्यावर एक प्लेट ठेवतो. त्या प्लेटवर टॉयलेट पेपरचा रोल ठेवतो आणि मग त्यावर एक अंडं ठेवतो. यानंतर तो प्लेटला धक्का देतो. प्लेट एका बाजूला जाते आणि त्यावरील अंडं पाण्याने भरलेल्या ग्लासात पडतं. मुलगा एग ड्रॉप प्रयोग करण्यात यशस्वी येतो. त्यानंतर त्याच्या आनंदाला पारावर राहत नाही. तो टाळ्या वाजवत, उड्या मारत आनंद व्यक्त करतो. हे वाचा - मोठ्या तोऱ्यात स्टंट करायला गेली आणि…; गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडची काय अवस्था केली पाहा VIDEO पण त्याचवेळी त्याच्या वडिलांचे एक्स्प्रेशनही पाहण्यासारखे आहेत. जेव्हा त्यांच्या मुलाने प्लेटला धक्का दिला आणि अंड ग्लासातील पाण्यात पडलं तेव्हा त्यांच्या जीवात जीव नव्हता. अक्षरशः त्यांनी डोळे बंद केले. जणू जीव मुठीत घेऊनच ते होते. मुलाचा प्रयोग फसला असता तर अंड त्यांच्या डोक्यावर फुटलं असतं, किंवा ग्लासही त्यांच्या डोक्यावर आडवा झाला असता. त्यामुळे मुलाने प्रयोग यशस्वी केल्यानंतरही ते थोडावेळ शांतच असतात जसं काही त्यांना शॉक बसला आहे आणि थोड्या वेळाने आपल्या मुलाच्या यशावर तेसुद्धा हात वर करून आनंद व्यक्त करतात. हे वाचा - Michael Jackson आला वाटतं अंगात! भर रस्त्यात केलेला हा डान्स पाहा VIRAL VIDEO बरं हा व्हिडीओ इथंच संपला नाही. मुलगा शेवटी मुलांना धक्का देतोच. म्हणजे तो आपल्या हातात वडिलांच्या डोक्यावर ठेवलेला पाण्याचा ग्लास घेतो आणि त्यातील पाणी तो वडिलांवर ओततो. पाण्याने भरलेला ग्लास तो पूर्णपणे आपल्या वडिलांवर ओतून रिकामा करतो आणि त्यानंतर तिथून पळ काढतो. Good Morning America नावाच्या ट्विटर अकांटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. मुलाच्या टॅलेंटला सर्वांनी दाद दिली आहे.