जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ...अन् घोड्याने स्वतःलाही आगीत झोकलं; VIDEO च्या शेवटी आहे कारण, पाहूनच डोळ्यात पाणी येईल

...अन् घोड्याने स्वतःलाही आगीत झोकलं; VIDEO च्या शेवटी आहे कारण, पाहूनच डोळ्यात पाणी येईल

घोड्याने स्वतःला आगीत झोकलं.

घोड्याने स्वतःला आगीत झोकलं.

स्वतःला आगीत झोकून देणाऱ्या या घोड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 02 एप्रिल :  प्राण्यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्राण्यांच्या इतर व्हिडीओपेक्षा हा व्हिडीओ खूपच वेगळा आहे. एका घोड्याचा हा व्हिडीओ. या घोड्याने चक्क स्वतःला आगीत झोकून दिलं आहे. त्याने असं का केलं, याचं कारण या व्हिडीओच्या शेवटी आहे. हे कारण तुम्हाला समजलं तर तुमच्या डोळ्यातही पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सामान्यपणे तुम्ही प्राण्यांचे मजेशीर-क्युट, शिकारीचे खतरनाक व्हिडीओ पाहिले असतील. पण असा व्हिडीओ कदाचित नाही. व्हिडीओत घोड्याने जे केलं ते थक्क करणारं आहे. कोणताही जीव असो त्याला आपल्या जीवाची पर्वा असते. म्हणजे आपला मृत्यू व्हावं असं माणसंच नव्हे तर प्राण्यांनाही वाटत नाही. प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो. असं असताना हा घोडा मात्र स्वतः आगीत गेला. पण त्याने असं का केलं? हे तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरच समजेल.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका ठिकाणी आग लागली आहे. आगीमुळे येणारे धुराचे लोट दिसत आहेत. काही लोक तिथून जात आहेत, त्यांच्यासोबत घोडे दिसत आहेत. या घोड्यांना आगीतून वाचवून बाहेर काढलं आहे. माणसं, घोडे आगीपासून दूर जात असताना या आगीपासून दूर असलेला एक घोडा मात्र आगीजवळ धावत जाताना दिसतो. कसं शक्य आहे? मगरीच्या पोटातून जसाच्या तसा जिवंत बाहेर आला माणूस; आजवर कधीच पाहिला नसेल असा VIDEO वेगाने येत हा घोडा थेट आगीत प्रवेश करतो. तेव्हाच आपल्याला धडकी भरते. घोडा धावत आत जातो. थोड्या अंतरावर गेल्यानंतर आणखी दोन घोडे दिसतात. त्यापैकी एक शिंगरू आहे. त्या दोघांना पाहिल्यांनंतर त्यांच्यासह हा घोडाही मागे फिरतो. तिघंही आगीतून बाहेर पडण्याच्या दिशेने जातात. एकंदर व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला समजलं असेल हा घोडा आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आगीत गेला. आपल्या कुटुंबासाठी त्याने आपल्या जीवाची बाजी लावली. आपला जोडीदार आणि पिल्लाला सुखरूप आगीतून बाहेर काढलं. स्वतः मृत्यूच्या दारात जात त्यांना मृत्यूच्या दाढेतून खेचून काढलं. फक्त माणसंच नव्हे तर प्राणीही आपल्या कुटुंबासाठी काहीही करू शकतात हेच या व्हिडीओतून दिसून येतं आहे. आश्चर्य! याच्या पोटावर चेहरा; गाईच्या अजब वासराला पाहण्यासाठी लोकांच्या रांगा; पाहा PHOTO @DoctorAjayita या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

जाहिरात

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात