सुनील रजक/भोपाळ, 31 मार्च : दक्षिण आफ्रिकेहून भारतात आणलेल्या चित्त्यांना मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कच्या जंगलात सोडलेलं आहे. पण या जंगलातील एक चित्त्याने मात्र जंगलातून पळ काढला. जंगलातून बाहेर येत तो गावात घुसला. गावातील एका शेतात लपून बसला. या चित्त्याचा व्हिडीओही समोर आला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. कुनो नॅशनल पार्कच्या सीमेजवळ शिवपुरी गाव आहे. इथले काही लोक सकाळी सहाच्या सुमारास कांद्याच्या शेतात गेले. तिथं त्यांना एक चित्ता दिसला. हा चित्ता की बिबट्या हे लोकांना आधी समजलं नाही. पण खतरनाक प्राण्या ला पाहून सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं. गावात एकच खळबळ उडाली. दहशत निर्माण झाली, भीतीचं वातावरण होतं. पण तरी चित्त्याला पाहण्याची उत्सुकता होती, त्यामुळे ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. काही लोक झाडावर चढून चित्त्याला पाहत होते.
या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, शेतात कुंपणाजवळ हा चित्ता दबा धरून बसला आहे. कुणी शिकारी मिळतो आहे, त्याचीच तो प्रतीक्षा करत आहेत. त्याची नजर शिकारीच्या शोधात आहे. शिकार आपल्या जाळ्यात सापडावा म्हणून तो शेतात लपून बसलेला दिसतो आहे. या चित्त्याने जंगलाबाहेर येताच डावही साधला आहे. एका गायीची त्याने शिकार केल्याचीही माहिती आहे. …अन् घोड्याने स्वतःलाही आगीत झोकलं; VIDEO च्या शेवटी आहे कारण, पाहूनच डोळ्यात पाणी येईल मृदरम्यान गावात चित्ता घुसल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. वनविभागाची टीम तात्काळ तिथं दाखल झाली. अखेर चित्त्याला पकडण्यात यश आलं आहे. त्याला पिंजऱ्यात बंद करून पुन्हा आता कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडलं जाणार आहे. रविवारची ही घटना आहे.
चित्ता हा जगातला सर्वांत वेगाने धावणारा प्राणी आहे. तो ताशी 112 किलोमीटर्स वेगाने धावू शकतो. पूर्ण ताकदीने धावल्यानंतर चित्ता सात मीटरपर्यंत उडी मारू शकतो. चित्त्यांना रात्री नीट दिसत नसल्याने ते दिवसा शिकार करतात. सध्या जगभरात 7100 चित्ते आहेत. कसं शक्य आहे? मगरीच्या पोटातून जसाच्या तसा जिवंत बाहेर आला माणूस; आजवर कधीच पाहिला नसेल असा VIDEO भारतात एकही चित्ता नव्हता. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत दक्षिण आफ्रिकेहून हे चित्ते भारतात आणण्यात आले. देशात तब्बल 70 वर्षांनंतर चित्ते पाहायला मिळत आहेत. आफ्रिकन चित्ते आशियाई चित्त्यांपेक्षा वेगळे असतात.