नवी दिल्ली 04 मार्च : अनेकांना अॅडव्हेंचर खूप आवडतं. फक्त कुठेतरी जाऊन फिरण्याची आवडच नाही, तर काही नवीन अनुभव घ्यायलाही काही लोकांना आवडतात. अशा लोकांसाठी जंगलात कॅम्पिंग हा एक चांगला पर्याय आहे. हिल स्टेशनवर कॅम्पिंग करण्यासाठी तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे. कोणी आपल्या जोडीदारासह, कोणी आपल्या मित्रांसोबत तर कोणी आपल्या कुटुंबासह कॅम्पिंगला जातात. एखादं ठिकाण एक्सप्लोर करण्यासाठी कॅम्पिंग ही चांगली कल्पना आहे, परंतु या दरम्यान सावधगिरी बाळगणंदेखील आवश्यक आहे. कारण सध्या कॅम्पिंगचा एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल. हा व्हिडिओ यूट्यूबवर Maasai Sightings नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, बोत्सवानाच्या कालागडी ट्रान्सफ्रंटियर पार्कमध्ये कॅम्पिंग करणारे काही पर्यटक जेव्हा परत आले तेव्हा त्यांच्या तंबूत सिंह पाहून त्यांना धक्काच बसला. काही लोक जंगलात कॅम्प करत असलायचं व्हिडिओमध्ये दिसतं. तिथे त्यांनी टेंट लावला आहे. बाहेर काही खुर्च्या पडल्या होत्या. हे लोक काहीतरी नवीन जागा शोधण्यासाठी बाहेर पडले आहेत असं दिसतं. चवताळलेल्या हत्तीचा पर्यटकांवर हल्ला; जंगल सफारीदरम्यान घडला भयंकर प्रकार..Live Video इतक्यात एक सिंह तिथे पोहोचतो. प्रथम तो तंबूभोवती फिरतो. इकडे तिकडे पाहतो. बहुधा तो शिकार शोधत आहे. पण काही वेळातच तो तंबूच्या आत शिरतो. तो इतक्या झपाट्याने आत जातो की तिथं कोणी असते तर त्याला आपला जीव गमवावा लागला असता. सिंह बराच वेळ तंबूच्या आत काहीतरी शोधतो. सामान फिरवतो. पण काहीही सापडत नाही तेव्हा तो कपडे घेऊन बाहेर पडतो. हे पाहून असं वाटतं जणू त्याने काहीतरी शिकार आपल्या जबड्यात दाबली आहे. यानंतर तो थोडा वेळ बाहेर फिरतो. शिकार शोधतो… मग तिथून निघतो.
येथे कॅम्पिंग करणाऱ्या जोडप्याने सांगितलं की आम्ही तिथे काहीतरी शूट करणार होतो. पहिली रात्र होती. सकाळी लवकर उठलो. सकाळचे सहा वाजले असावेत. खूप अंधार पडला होता. आम्ही कॉफी बनवत होतो आणि दात घासत होतो. तेव्हाच आमची नजर सिंहावर पडली. तो तंबूच्या दिशेने येत होता. आम्ही मागे हटलो आणि गाडीत बसलो. तेव्हा गाडीचा मागचा दरवाजा उघडा असल्याचं दिसलं. आम्ही आणखीच घाबरलो. पण बाहेर येण्याची हिंमत होत नव्हती. आम्ही गाडी सुरू केली आणि काही अंतर जाण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, सिंह तंबूच्या आत गेला. माझी स्लीपिंग बॅग बाहेर काढली आणि त्यातून काहीतरी खाऊ लागला. सुदैवाने तो अजिबात आक्रमक नव्हता आणि आम्ही थोडक्यात बचावलो. बापरे! मसाज करण्यासाठी तरुणीने हात लावताच मगरीने काय केलं पाहा..थरारक VIDEO हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता पण आतापर्यंत तो जवळपास आठ लाख वेळा पाहिला गेला आहे. शेकडो लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, हे जोडपं खूप भाग्यवान होतं की ते त्या तंबूत झोपलेलं नव्हतं. त्यांनी बरोबर डोकं चालवलं. संपूर्ण परिसरात सिंह वावरत असल्याचं कळल्यावर त्यांनी इथे जाणं टाळावं. आणखी एका युजरने लिहिलं की, पर्यटक असो की अन्य कोणी, ही जमीन वन्यजीवांची आहे. तिथे राजेशाही वातावरण राहाणं धोक्याचंच असणार. त्यांच्या गोपनीयतेचा आदर करा. तिसऱ्या यूजरने लिहिलं, आता हे कपल कधीही कॅम्पिंगला जाणार नाही.