नवी दिल्ली 04 मार्च : सिंह, वाघ, गेंडा यांसारखे धोकादायक प्राणी प्राणीसंग्रहालयात पाहायला मिळतात, पण त्यांना जंगलात पाहण्यात जी मजा येते ती कुठेही नाही. म्हणूनच बहुतेक लोक वेळोवेळी जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडतात. पण असं म्हणतात की तुम्ही जिथे राहता तिथले नियम पाळावे लागतात. त्याचप्रमाणे तुम्ही जंगलात असाल तर तिथले नियम पाळावे लागतात. जर तुम्हाला हे पटत नसेल, तर या लोकांचं जे झालं ते तुमच्यासोबतही होऊ शकतं.
जेव्हा बिबट्या आणि सिंहिण आपसात भिडतात; कोणी जिंकली लढाई? पाहा VIDEO
इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही जंगल सफारीचा आनंद घेण्यापूर्वी 10 वेळा विचार कराल. सिंह हा जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी मानला जातो. तर हत्ती मात्र खूप शांत असतो. पण ही शांतता तेव्हाच असते जेव्हा हत्तीला राग येत नाही. त्याला राग आला की मग कहर होणार हे नक्की. पर्यटकही त्याचे बळी ठरू शकतात. सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हत्तीचा हाच राग पाहायला मिळतो, याचा व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही पर्यटक सफारी वाहनात जंगल फिरायला गेले आहेत. ते अनेक भागात फिरत आहेत पण पुढे काय होणार आहे, याची त्यांना कल्पनाही नाही. हे लोक हत्तीजवळ जाताच हत्तीला राग येतो. मग एक मोठा हत्ती पर्यटकांच्या वाहनासमोर आला आणि त्याने रस्ता अडवला. एवढंच नाही तर वाहन उलटविण्याचाही प्रयत्न सुरू केला. धोकादायक परिस्थिती पाहून सर्व पर्यटक इकडे तिकडे धावू लागले. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.
पक्ष्याला पाहून सिंहही थरथरू लागला; जंगलाच्या राजाचीही हवा टाईट करणारा हा पक्षी कोण पाहा VIDEO
व्हिडिओच्या शेवटी, हत्तीच्या हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये कसा गोंधळ उडतो हे तुम्हाला दिसेल. प्रत्येकजण आपापले सामान सोडून कसा तरी जीव वाचवण्यासाठी धावू लागतो. हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ big.cats.india नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मानव या सुंदर प्राण्यांना एकटं कधी सोडणार. ही क्लिप आतापर्यंत 80 हजार वेळा पाहिली गेली आहे. सुमारे अडीच हजार लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Elephant, Video viral