नवी दिल्ली, 6 मार्च : माणसांची असो की प्राण्यांची, आई ती आईच असते. एका आईने आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी केलेली धडपड व्हिडीओत कैद झाली आहे. जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी, अन्नासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. कधी शिकारीसाठी धडपड करावी लागते, तर कधी शिकर होण्यापासून वाचण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सोशल मीडियावर (social media) असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. एक जिराफ (Giraffe) आपल्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी सिंहांशी (Lion) भिडल्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ काही वर्ष जुना आहे. या व्हिडीओमध्ये आईची आपल्या पिल्लाला वाचवण्याची धडपड दिसते आहे.
व्हिडीओमध्ये जंगलात जिराफचं पिल्लू आपल्या आईपासून काही अंतरावर असतं. त्यावेळी दोन सिंह त्या पिल्लांवर हल्ला करतात. सिंहाने जिराफाच्या पिल्लांवर हल्ला करत, त्याच्या पाठीवर चढत त्याला खाली जमिनीवर पाडलं. ते पिल्लू आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करतं. त्याचवेळी जिराफ आपल्या पिल्लांकडे येतं आणि आपल्या लांब मानेने सिंहाला हुसकावून लावतो. पण सिंहाच्या हल्ल्याने ते पिल्लू जखमी होतं आणि ते तसंच जमिनीवर पडून राहतं. रस्त्यालगतच ते पिल्लू पडलेलं असतं.
जिराफ आपल्या पिल्लांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. जवळचं असलेले सिंह जिराफ तेथून जाण्याची वाट पाहतात, जेणेकरून त्यांची शिकार त्यांना मिळावी. सिंह सारखं त्या पिल्लांना खेचून आणण्याचा प्रयत्न करतात, पण जिराफ सतत त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत राहतो.
ते पिल्लू जखमी असल्यानं ते तसंच जमिनीवर पडून आहे. काही वेळाने जिराफ जसा त्या पिल्लापासून दूर जातो, तसं सिंह त्या पिल्लाला खेचत जंगलात नेतात. जिराफ पुन्हा सिंहावर गुरगुरू लागतो. परंतु जिराफ आपल्या पिल्लाचा जीव वाचवू शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mother, Other animal, Video Viral On Social Media, Viral videos, Wild animal