• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • एवढ्याशा म्हशीनं भल्यामोठ्या हत्तीला शिंगावर धरलं आणि... पुढे काय घडलं पाहा VIDEO

एवढ्याशा म्हशीनं भल्यामोठ्या हत्तीला शिंगावर धरलं आणि... पुढे काय घडलं पाहा VIDEO

म्हैस आणि हत्तीची (elephant and buffalo video) अशी लढाई तुम्ही पाहिली नसेल.

 • Share this:
  मुंबई, 05 मार्च : म्हशींची (buffalo) लढाई तशी आपल्यासाठी काही नवी नाही. कित्येक म्हशींना आपण शिंगांनी लढताना पाहिलं आहे. पण कधी म्हैस आणि हत्तीची (elephant and buffalo video) लढाई तुम्ही पाहिली आहे का? सध्या अशाच लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हत्तीची सोंड आणि म्हशीची शिंगं, दोघंही एकमेकांना भिडले. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतर आहे. हा व्हिडीओ आहे नगीलाई नावाच्या हत्तीचा आणि इविया नावाच्या म्हशीचा. ज्यामध्ये दोघंही आपल्याजवळी नैसर्गिक शस्त्रानं लढाई करताना दिसत आहेत. शेल्ड्रिक वाइडलाइफ ट्रस्टने (Sheldrick Wildlife Trust) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
  व्हिडीओत पाहू शकता म्हैस एका ठिकाणी उभी आहे. तितक्यात एक हत्ती तिच्याजवळ येतो. तिच्या शिंगांच्या मध्ये सोंड टाकतो. मग काय म्हैसपण मागे राहते की काय? तीपण हत्तीला टक्कर देण्यासाठी तयार होते. हे वाचा - ओ तेरी! हे काय? पाण्यात तरंगता तरंगता हवेत उडू लागलं भलंमोठं जहाज हत्तीच्या सोंडेला म्हैस शिंगांवर धरते.  आता यांच्यात तुफान राडा होणार की काय? असचं काही क्षण वाटतं. पण हे काय हा तर ट्वीस्ट नगीलाई आणि  इविया  हे दोघांचे शत्रू नाहीत तर चक्क मित्र आहेत. खरंतर त्यांच्यातील ही लढाई म्हणजे दोन जिगरी यारांमध्ये होणारी लढाई आहे. या अनोख्या मैत्रीचा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. हे वाचा - कॅटवॉक करतचं गाडीसमोर उभी राहिली गाय; VIDEO पाहून तुम्हीही अवाक् व्हाल! हा व्हिडीओ शेअर करताना शेल्ड्रिक वाइडलाइफ ट्रस्टनं या दोघांच्या मैत्रीची माहितीही दिली आहे. दोघंही अनाथ आहेत पण एकमेकांसाठी जगतात. सुरुवातीपासून एकमेकांना पाहत आले, एकमेकांसारखं खेळत आले आणि पुढे जाऊन त्यांच्यात मैत्रीही झाली. आता दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नाही. ते दोघं एकत्र खेळले नाहीत असा एकही दिवस नाही.
  Published by:Priya Lad
  First published: