नवी दिल्ली, 7 मार्च : मनुष्य जसं आपल्या कुटुंबियांची काळजी घेतो, त्याचप्रमाणे प्राणीही त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतात. जंगलात राहताना प्राण्यांना मोठा संघर्षही करावा लागतो. जंगलातील प्राण्यांपैकी एकत्र राहणाऱ्यांमध्ये हत्तीचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. हत्ती समजूतदार असण्यासोबतच कौटुंबिक असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच ते जंगलात नेहमी कळपाने राहतात. ज्यावेळी त्यांच्या कळपातील एखाद्यालाही समस्या येते, त्यावेळी हत्तींचा संपूर्ण कळपच त्याला समस्येतून बाहेर काढण्यासाठी एकत्र येतो.
हत्तीच्या कळपाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात हत्तीच्या एका कळपावर सिंहाच्या झुंडने हल्ला केला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये एका जंगलात हत्तींचा कळप उभा असल्याचं दिसतंय. या कळपासमोर काही सिंहांची झुंड आहे. सिंह या हत्तीच्या कळपावर हल्ला करण्याच्या विचारात आहेत. हत्तींच्या या कळपातील एका हत्तीणीने एका पिल्लांना जन्म दिला आहे.
हत्तीणीने नुकताच पिल्लाला जन्म दिला असून ते पिल्लू जमिनीवरच असल्याचं दिसतंय. सिंहाला या पिल्लाची शिकार करायची आहे. परंतु हत्तींचा संपूर्ण कळप त्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाची आणि त्याच्या आईची सुरक्षा करत आहे. हत्तींचा कळप या सिंहांना हुसकावून लावण्याचाही प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान एक हत्ती सिंहांच्या दिशेने जाऊ लागतो आणि त्या पाठोपाठ त्याचं एक पिल्लूही जातं.
त्याचवेळी सिंहांची झुंड हत्तीवर हल्ला करते. हत्ती सिंहाला जवळ येऊ न देण्याचा प्रयत्न करतो, परंतु एक नाही, तर तीन सिंह हत्तीवर मागून हल्ला करतात. हत्ती वेगात गोल फिरुन सिंहांना हुसकावून लावतो आणि स्वत:चा बचाव करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.