मुंबई 26 मार्च : सोशल मीडियावर आपल्याला दररोज अनेक साहस आणि आश्चर्यकारक पराक्रमांनी भरलेले व्हिडिओ पहायला मिळतात. जे पाहून युजर्सलाही घाम फुटतो. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एकाच ठिकाणी वारंवार वीज पडताना दिसत आहे.
धावत्या मेट्रोचं गेट उघडून घेतली उडी; व्यक्तीसोबत घडलं अतिशय भयानक..थरारक घटनेचा VIDEO
सहसा आपण सर्वांनी पाऊस आणि वादळापूर्वी आकाशात ढगांचा गडगडाट पाहिला असेल. त्यादरम्यान विजांचा कडकडाटही होताना दिसतो. अनेकदा या आकाशीय विजांचा कडकडाट प्रचंड मोठाही असतो. तर, अनेकदा वीज जमिनीवर पडताना दिसते. ही वीज जिथे पडेल, तिथलं सर्वकाही नष्ट करून टाकते. सध्या वीज पडतानाचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
Watch as lighting strikes again and again in the same spot 😳 pic.twitter.com/BCfapYSLa6
— OddIy Terrifying (@OTerrifying) March 23, 2023
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. @OTerrifying नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण एकाच ठिकाणी एकापाठोपाठ चार वेळा वीज पडताना पाहू शकतो. झाडावर वीज पडल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे त्या झाडाला आग लागते.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला 8.8 दशलक्ष पेक्षा जास्त म्हणजे 88 लाख वेळा पाहिलं गेलं आहे आणि एक लाख 60 हजाराहून अधिक युजर्सनी लाइक केलं आहे. व्हिडिओ पाहून अनेक युजर्स थक्क झाले आहेत आणि ते एकाच ठिकाणी एवढ्या वेळा वीज पडणे हे आतापर्यंतचे सर्वात भयानक दृश्य असल्याचे म्हणत आहेत. दुसरीकडे, अशा घटनांमध्ये कोणाचाही मृत्यू होऊ शकतो, असं काहींचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.