वॉशिंग्टन, 02 जुलै : पूर्वी एकमेकांना पत्र पाठवली जायची. या पत्रातील शब्दांतून भावना व्यक्त व्हायच्या. त्यामुळे ही पत्रं खूप अनमोल असायची. पण ती त्या त्या व्यक्तीसाठी. इतरांसाठी हे पत्र म्हणजे फक्त एक कागद आणि त्यावर लिहिलेला निरोप इतक्यापुरतीच मर्यादित असतो. पण तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटेल. असंच दुसऱ्या कुणासाठी तरी लिहिलेलं पत्र खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या. या पत्राची किंमत तब्बल 32 लाख रुपये आहे. दुसऱ्या कुणाला तरी लिहिलेल्या पत्रासाठी इतके पैसे मोजण्यासाठी तयारी लोकांची आहे, असं या पत्रात आहे तरी काय, हे जाणून घेण्याची उत्सुकता आता तुम्हालाही असं असेल. एका व्यक्तीने त्याच्या शेजारी राहणाऱ्या वधूला लिहिलेलं हे पत्र आहे. हे पत्र 14 डिसेंबर 1824 रोजी लिहिलं होतं, गेली 200 वर्षे हे पत्र एका कुटुंबाकडे होतं. आता या पत्राचा लिलाव करण्यात आला. तब्बल 32 लाख रुपयांना या जुन्या पत्राची बोली लागली. हे पत्र एका मोठ्या चामड्याने बांधलेल्या अल्बममध्ये ठेवलेलं आहे, अल्बम नुकताच लिलावासाठी ठेवण्यात आला आणि दुसऱ्याच दिवशी तो विकला गेला. ते कोणी विकत घेतलं याची माहिती उघड झाली नाही.
असं या पत्रात काय आहे, किंवा काय लिहिलं आहे, हे आता पाहुयात. पत्रात लिहिलेला मजकूर असा की… “माझा जिवलग मित्र जज पीटर्स आणि त्याची पार्टनर मिस रॉबिन्सन यांच्या कुटुंबासोबतच्या तुझ्या नात्याबद्दल मी खूप आनंदी आहे. मी जिवंत असेपर्यंत या दोघांचीही स्नेहपूर्वक आठवण ठेवीन. माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्हाला जीवनातील प्रत्येक समृद्धी आणि आनंदाचा भाग बनण्याची संधी मिळेल. मी स्वतःला तुमचा खरा मित्र मानतो.
डॉक्टर असून स्वतःच्या मुलांना खायला घालते Expired Food; सांगितलं विचित्र कारण
आता मजकूर वाचल्यानंतर तोसुद्धा तुम्हाला इतका खास वाटणार नाही की त्यासाठी लोक इतके लाखो रुपये देतील. मग या पत्रात काय खास आहे. वास्तविक या पत्रातील मजकूर नव्हे तर हे पत्र लिहिलणारी व्यक्ती खास आहे. हे पत्र कुणी सामान्य माणसाने लिहिलेलं नाही. तर अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अॅडम्स यांनी लिहिलं आहे. अॅडम्स हे अमेरिकन क्रांतीच्या फायरब्रँड नेत्यांपैकी एक होते. संविधानाधारित सरकारचे शिल्पकार म्हणून ते जगभर ओळखले जातात. ते खूप रोमँटिक होते आणि ते पत्रांमधून व्यक्त व्हायचे. आपल्या पत्नीशी त्यांनी आयुष्यभर पत्रव्यवहार केला, कारण ते बराच काळ तिच्यापासून दूर होते.
चेहरा नव्हे तरुणीच्या पायाचे चाहते; एका झलकसाठी देतात लाखो रुपये, प्रकरण काय?
जॉन अॅडम्स 89 वर्षांचे होते तेव्हा ते बोस्टनमधील फार्म हाऊसमध्ये राहत होते. त्यांच्या शेजारी एक कुटुंब राहत होतं, ज्यांच्या मुलीचं नाव एलेन मारिया ब्रॅकेट होते. ती 19 वर्षांची होती. अॅडम्स यांचं तिच्यावर इतकं प्रेम होतं की तिचं लग्न होत असताना त्यांनी तिला एक सुंदर पत्र लिहिलं. जे या कुटुंबाने 200 वर्षे जतन केले होते. त्यावर जॉन अॅडम्स यांची सहीही आहे. ब्रॅकेटनेच अॅडम्स यांना हे पत्र लिहिण्यास सांगितलं असल्याचं सांगितलं जातं.
जॉन अॅडम्स यांनी नवरीसाठी लिहिलेलं पत्र. (Photo_raabcollection)
राब कलेक्शनचे लिलावकर्ता नॅथन राब यांनी सांगितलं की, या प्रकारच्या दस्तऐवजात आम्ही यापूर्वी कधीही अध्यक्षांचं पत्र पाहिलं नाही. एक वृद्ध जॉन अॅडम्स तिथं बसून या तरुणीसोबत आपले विचार शेअर करत असल्याची कल्पना करणं अविश्वसनीय आहे.