जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चेहरा नव्हे तरुणीच्या पायाचे चाहते; एका झलकसाठी देतात लाखो रुपये, प्रकरण काय?

चेहरा नव्हे तरुणीच्या पायाचे चाहते; एका झलकसाठी देतात लाखो रुपये, प्रकरण काय?

चेहरा नव्हे तरुणीच्या पायाचे चाहते

चेहरा नव्हे तरुणीच्या पायाचे चाहते

आपलं पोट भरण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी लोक खूप कष्ट घेतात. वेगवेगळे काम करुन लोक पैसै कमावतात. मात्र जगात असेही लोक आहेत जे विचित्र काम करुन पैसा कमावतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 02 जुलै : आपलं पोट भरण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी लोक खूप कष्ट घेतात. वेगवेगळे काम करुन लोक पैसै कमावतात. मात्र जगात असेही लोक आहेत जे विचित्र काम करुन पैसा कमावतात. आपण विचारही करु शकत नाही अशा गोष्टी करुन लोक पैसै कमावतात. नुकतीच एक तरुणी चर्चेत आली आहे जी फक्त तिच्या पायांच्या सौंदर्यामुळे पैसे कमावते. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. ऐकायला हे विचित्र वाटेल मात्र तरुणी फक्त तिच्या पायांमुळे कमाई करते. या 28 वर्षीय तरुणीचं नाव अमेलिया आहे. ती सुरुवातीला नर्स म्हणून काम करायची. पण नंतर तिने स्वतःसाठी दुसरा पर्याय निवडला ज्यामधून तिला अधिक पैसा मिळेल. तरुणी फक्त पाय दाखवून लाखो रुपये कमावते. आणि लोक तिच्यावर लाखो रुपये खर्च करतात.

News18लोकमत
News18लोकमत

लंडनची रहिवासी असलेल्या अमेलियाचे पाय तिच्या कमाईचे साधन बनले आहेत. डेलीस्टारशी बोलताना तिने पायाशी संबंधित कंटेंट बनवून लाखो रुपये कसे कमावते याविषयी सांगितलं. जेव्हा तिनं हे काम सुरू केलं तेव्हा तिचा आपल्या कमाईवर विश्वास बसत नव्हता. 6 महिन्यांत तिनी लाखोंची कमाई केली. लोक तिच्या पायांकडे इतके आकर्षित झाले की त्यांनी विविध विनंत्या करण्यास सुरुवात केली. डॉमिनोजच्या डिलिव्हरी बॉयने महिलेला केले प्रपोज, म्हणाला, ‘मी तोच आहे जो….’ पायांमधून कमाई सुरु केल्यावर तिनं पायाची विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली. तिच्या पायावर एकही डाग ती पडून देत नाही. अमेलियाला ‘फन विथ फीट’ नावाच्या वेबसाइटबद्दल माहिती मिळाली, जी पायांच्या सुंदर चित्रांच्या बदल्यात पैसे देते. त्यानंतर अमेलियाने येथे चित्रे पोस्ट करण्यास सुरुवात केली. ती महिन्याला 5 हजार पौंड म्हणजेच सुमारे 5 लाख रुपये कमावते. एमिलियाने असेही सांगितले की काही लोक तिला विचित्र विनंती देखील करतात जसे की लोशनमध्ये पाय बुडव, पायाला लोशन लाव. तर काही शिजलेले बीन्स घालायला सांगतात. दरम्यान, सध्या अनेलिया सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. तिचा पैसै कमावण्याचा फंडा ऐकून भलेभले थक्क झाले. यामुळे असंही करुन कोणी पैसै कमावू शकतो हे समोर आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात