लंडन, 01 जुलै : काहीही खरेदी करताना आपण त्याची एक्स्पायरी डेट चेक करतो. एक्स्पायर डेटआधीच ती वस्तू वापरतो. जर ती वस्तू किंवा पदार्थ एक्स्पायर झाला असेल, तर तो आपण घेत नाही, फेकून देतो. डॉक्टरही एक्सपायर फूड खाऊ नका असंच सांगतात. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल. एक डॉक्टरच स्वतः मुद्दामहून एक्स्पायर फूड खरेदी करते, स्वतः खाते आणि आपल्या मुलांनाही ती खायला घालते. मारियान ट्रेंट असं या महिलेचं नाव आहे. इंग्लंडमध्ये राहणारी 41 वर्षांची मारियान एक डॉक्टर आहे. ती क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. द सनच्या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, तिने सांगितलं की, ती डोळे आणि नाक यावर विश्वास ठेवते. पदार्थाची चव चांगली असेल आणि त्यातून कुजल्याचा वास येत नसेल तर याचा अर्थ अन्न चांगलं आहे. आपले पूर्वजही खाद्यपदार्थ पाहून आणि त्याचा वास घेऊन ते खाण्यायोग्य आहे की नाही हे ठरवायचे, असं ती सांगते. एखादा पदार्थ एक्सपायर झाला असेल तरी ती विकत घेते. कारण नंतर ते अन्न शिजलं की त्यातील सर्व जंतू मरतात यावर तिचा विश्वास आहे.
पण काही गोष्टी मात्र ती ताज्याच घेते. जसं की मांस. त्याचा धोका ती पत्करत नाही. मांस फ्रोजन असेल तर ठिक आहे. नाहीतर ती एक्सपायर डेटच्या आधीच घेण्याचा प्रयत्न करते. मांसाशिवाय ती दूध, भाजीही तारीख पाहून घेते. असं करून ती पैशांची बचत करत असल्याचं सांगते. अशाप्रकारे ती दर आठवड्याला खाण्यापिण्याचे सुमारे 1 हजार रुपये वाचवते. सावधान! भाजी घेण्याआधी हा VIDEO जरूर पाहा; नवी मुंबई APMC मध्ये धक्कादायक प्रकार काही खाद्य पदार्थांची एक्सपायरी डेट संपली तरी ते त्या दिवशी खराब होत नाहीत आणि काही एक्सपायरी डेट संपल्यानंतरही वापरता येतात. पण काही काळजी घ्यायला हवी. दूध - कोणतेही पॅकेज केलेले दूध एक्स्पायरी डेटच्या आठवड्याभरानंतरही वापरता येते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.पण दुधात फॅटचे प्रमाण किती आहे हे लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. एक्सपायरी डेटनंतर सात ते दहा दिवस फॅट नसलेले दूध वापरु शकतो. दूध खराब झाले तर घट्ट होऊन आंबट वास येऊ लागतो. त्यामुळे काळजीपूर्वक दूधाचा वापर करणं गरजेचं आहे. पनीर - बहुतेक पनीरची एक्सपायरी डेट नसते, असं लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील नोंदणीकृत आहारतज्ञ सोफिया नॉर्टन यांनी म्हटलं आहे. काही पनीरच्या पृष्ठभागावर पांढरा किंवा निळसर-हिरवा थर निर्माण होतो. तो थर आल्यामुळे आपण संपूर्ण पनीर खराब म्हणून फेकून देतो. मात्र आपण पांढरट किंवा निळसर आलेला थर कापून बाकी पनीर वापरण्यासाठी घेऊ शकतो. ब्रेड - पॅक केलेले ब्रेड सहसा लवकर एक्सपायर होतात. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील कॅनेडियन-आधारित पदवीधर नोंदणीकृत आहारतज्ज्ञ मेगन वोंग यांचं म्हणणं आहे. एखाद्या रुमचं तापमान सामान्य असेल आणि ब्रेड थंड आणि कोरड्या जागी ठेवला असेल तर ब्रेड पाच ते सहा दिवस वापरला जाऊ शकतो. ब्रेड एक्सपायरी डेटनंतरही तुम्हाला खायचा असेल तर त्याला फिजमध्ये ठेवून वापर करावा. ब्रेडवर जर निळा हिरवा थर आलेला दिसला तर तो खराब झाला असून फेकून द्यावा. भारतीयांचं ‘बिर्याणी प्रेम’; 12 महिन्यात swiggy वरुन इतक्या कोटी ऑर्डर अंडी - अंड्याच्याकॅरेटवर किंवा पॅकेजवर कोणतीही एक्स्पायरी डेट लिहिलेली नसते पण खरेदी केल्यापासून तीन ते पाच आठवडे अंडी सहज वापरता येतात.उकडलेले अंडे लवकर खराब होतात आणि फ्रीजमध्ये ठेवले तर एक आठवड्यापर्यंत वापरता येतात. जर तुम्हाला अंडी खराब झाली आहेत का चाचणी करायची असेल तर त्यांना पाण्यात टाका. अंडी तर पाण्यात तरंगली तर ती खराब झाली आहेत. पास्ता - कोरडा किंवा कच्चा पास्ता एक्सपायरी डेटनंतर दोन महिने खाता वापरता येऊ शकतो .सुपरमार्केट रेफ्रिजरेटरमध्ये न शिजवलेला पास्ता सामान्यतः एक्स्पायरी डेटनंतर चार ते पाच दिवस वापरू शकतो. शिजवलेला पास्ता फ्रीजरमध्ये व्यवस्थित ठेवल्यास सहा ते आठ महिने वापरता येतो.