मुंबई, 23 नोव्हेंबर : बिबट्याचे (Leopard video) तसे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत असतात. बिबट्या म्हणजे हिंस्र (Wild animal video) प्राणी हे आपल्या माहितीच आहे. त्यामुळे त्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे बहुतेक व्हिडीओ हे शिकारीचे (Animal hunting video) असतात. बिबट्याला शिकार (Leopard attack video) करताना तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल. पण आता बिबट्याचा असा एक व्हिडीओ समोर आला असेल, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. हिंस्र बिबट्याचं असं रूप तुम्ही कदाचित कधीच पाहिलं नसावं (Leopard and spring buck video).
एखाद्या बिबट्यासमोर दुसरा कोणता प्राणी आला तर तो बिबट्या काय करेल? साहजिकच याचं उत्तर तो त्या प्राण्यावर झेप घेत त्याची शिकार करेल. आपल्याला बिबट्याबाबत जे माहिती आहे, जे आपण त्याच्याबाबत पाहत आलो त्यावरून तसं हे उत्तर योग्यच आहे. पण या बिबट्याने मात्र तसं केलं नाही. समोर दुसरा प्राणी दिसताच त्याने असं काही केलं की पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. आता इतकं या बिबट्याने नेमकं काय केलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही लागली असेल नाही का?
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक हरण दिसतं आहे. हरण आपल्या पिल्लाला जन्म देतं. तितक्यात तिथं एक बिबट्या येतो. बिबट्याला पाहून हरणाची आई त्याला जन्म देताच आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळून जाते. पिल्लू नुकतंच जन्मलेलं असतं. त्यामुळे ते काही पळू शकत नाही, ते तसंच तिथं बसून राहतं. बिबट्या पिल्लाच्या जवळ येतं. यावेळी आता हा बिबट्या या पिल्लाचा घास घेतो की काय? असंच आपल्याला वाटतं. पण पुढे जे घडलं त्याचा विचारच आपण करू शकत नाही.
हे वाचा - बापरे! CCTV कॅमेऱ्यात कैद झालं कुत्र्याचं भयानक दृश्य; Video पाहूनच फुटेल घाम
व्हिडीओत पुढे हे पिल्लू मोठं झालेलं दिसतं. आपल्या पायावर दिसतं आणि त्याच बिबट्यासोबत मस्ती करतानाही दिसतं. बिबट्याने या पिल्लाची शिकार केली नाही. तर जन्मानंतर जन्मदातीने सोडलेल्या या अनाथ पिल्लाला बिबट्याने आईची माया दिली. आपल्या मायेच्या कुशीत घेतलं आणि त्याला आईचं प्रेम देऊन वाढवलं. पिल्लूसुद्धा बिबट्यालाच आपली आई मानतं आहे. जसं आपल्या आईसोबत खेळावं, तिच्या कुशीत शिरावं तसंच ते बिबट्यासोबत करताना दिसतं आहे.
हे वाचा - कुत्र्याला मिळालं नवं आयुष्य, 4 लाख रुपये खर्चून बसवले कृत्रिम पाय; पाहा VIDEO
official_superherointraining इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही युझर्सनी हे दोन्ही व्हिडीओ वेगवेगळे असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या मते, पहिल्या व्हिडीओत पिल्लाचा बिबट्याने बळी घेतला. दुसऱ्या व्हिडीओत बिबट्या आणि हरण वेगवेगळे आहेत. तर काहींनी बिबट्याने ही भविष्यासाठी केलेली गुंतवणूक असल्याचं म्हटलं आहे. म्हणजे हरणाला वाढवल्यानंतर बिबट्या त्याला खाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Leopard, Viral, Viral videos, Wild animal