पाय नसणाऱ्या एका कुत्र्याला कृत्रिम (Doctor planted prosthetic legs to a rescued dog) पाय बसवून त्याला जीवनदान देण्याचं काम काही प्राणीप्रेमींनी केल्याचं समोर आलं आहे. असं म्हणतात की कुत्रा हा (Dog is friend of a man) माणसाचा सर्वात विश्वासू मित्र असतो. माणसाच्या गरजेला तो धावून येतो आणि नेहमीच माणसासोबत इमानदार राहतो. मात्र माणसांनी कुत्र्याला मदत केल्याच्या घटनेची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगली आहे. रेस्क्यु केलेल्या एका कुत्र्याची बिकट अवस्था पाहून त्याला (People helped dog) मदत करण्याचा चंग काही श्वानप्रेमींनी बांधला आणि तो तडीस नेला.
VIDEO: Monika the Russian rescue dog is ready for her new life after she was fitted with four prosthetic titanium paws after being found abandoned in a forest with four stumps pic.twitter.com/y38Ibkv8g2
— AFP News Agency (@AFP) November 22, 2021
अशी घडली घटना
रशियातील प्लास्टुनोवस्काया गावात एक कुत्रा काही नागरिकांना जखमी अवस्थेत आढळला. या कुत्र्याला चारही पाय नव्हते. एकेकाळी या कुत्र्यानं अनेक माणसांना मदत केली होती. मात्र त्यानंतर काही समाजकंटकांनी त्याचे चारही पाय कापून टाकले होते. त्यामुळे विकलांग अवस्थेत कण्हत बसलेला हा कुत्रा काही श्वानप्रेमींनी पाहिला आणि त्याची सुटका करण्याचा निर्णय़ घेतला.
कुत्र्याची अवस्था होती गंभीर
जेव्हा हा कुत्रा विकलांग अवस्थेत सापडला, तेव्हा त्याची अवस्था फारच बिकट होती. तो जिवाच्या आकांतानं कण्हत होता आणि त्याच्या वेदनांनी कळस गाठला होता. त्याला कुणीतरी लवकर मदत करण्याची गरज होती. त्यामुळे काही पशुप्रेमींनी या कुत्राला प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेले. त्यांनी कुत्र्यावर प्राथमिक उपचार तर केलेच, शिवाय त्याला कृत्रिम पाय बसवता येऊ शकत असल्याचंही सांगितलं. त्यासाठी खर्च येणार होता 4 लाख रुपयांचा
हे वाचा- गुंतवणुकीसाठी पैसे ठेवा तयार! बाजारात दाखल होणार 6 दिग्गज कंपन्यांचे आयपीओ
कुत्र्याचं यशस्वी ऑपरेशन
कार्यकर्त्यांनी काहीही करून कुत्र्याचं ऑपरेशन करायचं ठरवलं. त्यासाठी सर्वांनी एकत्र येत पैसे जमवले आणि कुत्र्याचं ऑपरेशन केलं. कुत्र्याला कृत्रिम पाय बसवण्यात आले. प्रॉस्थेटिकच्या या पायांवर आता कुत्रा उभा राहायला शिकला असून त्याचं आयुष्य हळूहळू पूर्वीसारखं होईल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Video viral