जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / World's shortest cow : वासरापेक्षाही ठेंगणी, दीड फुटांची राणी; चर्चेत आहे ही सर्वात लहान गाय

World's shortest cow : वासरापेक्षाही ठेंगणी, दीड फुटांची राणी; चर्चेत आहे ही सर्वात लहान गाय

World's shortest cow : वासरापेक्षाही ठेंगणी, दीड फुटांची राणी; चर्चेत आहे ही सर्वात लहान गाय

World’s shortest cow : या गायीला पाहताच ती एखादं खेळणंच असावं असं वाटतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

ढाका, 09 जुलै : जगातील सर्वात उंच किंवा लहान व्यक्तीचा रेकॉर्ड तुम्हाला माहिती असेल. पण जगातील सर्वात लहान गाय (World’s smallest cow) तुम्हाला माहिती आहे का? सध्या अशाच गायीची चर्चा आहे. फक्त 20 इंचाची म्हणजे जवळपास दीड फुटांचीच ही गाय सर्वांचं लक्ष वेधून घेते आहे. जगातील सर्वात लहान गाय (World’s shortest cow) असल्याचा दावा केला जातो आहे. बांग्लादेशमध्ये (Bangladesh) फक्त 20 इंचाची गाय दिसली आहे. तिचं नाव राणी (Rani) आहे. ढाकाजवळील एका फार्ममध्ये ही गाय राहते. ती 23 महिन्यांची आहे. तिला पाहताच एखादं खेळणंच असावं असं वाटतं. आतापर्यंत जगातील सर्वात छोटी गाय भारतातील केरळमध्ये (Kerala) आहेत. जिचं नाव माणिक्यम (Manikyam) आहे. जिची उंची 2014 साली 24 इंच होती. राणीची उंची 20 इंच आहे. म्हणजे जवळपास दीड फूटच आहे. हे वाचा -  ‘मी इतकी सुंदर, हॉट पण एकही बॉयफ्रेंड पटेना’, मॉडेलने मांडली आपली अजब व्यथा शिकोर एग्रो फार्मचे (Shikor Agro farm) मालक एम. ए. हसन हाऊलाडर यांनी (M.A. Hasan Howlader) या गायीचा आकार मोजून दाखवला. पण अद्याप ती जगातील सर्वात लहान गाय आहे, याची पुष्टी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सने (Guinness World Records) केली नाही आहे. गायीच्या मालकाच्या मते, गिनीज वर्ल्डने या गायीला आपल्या लिस्टमध्ये सामील करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी घेतला आहे. गिनीज बुकमध्ये नोंद झाल्यानंतर ही जगातील सर्वात छोटी गाय असेल. हे वाचा -  OMG! 9 नाही तर 15 महिन्यांचं बाळ; तब्बल 16 तासांनंतर आईच्या पोटातून आलं बाहेर या गायीला पाहण्यासाठी गर्दी होते. कोरोना लॉकडाऊनमध्येही लोक दूरदूरहून फक्त तिला पाहण्यासाठी येतात. तीन दिवसांतच 15,000 पेक्षा जास्त लोक आले होते, असं या गायीच्या मालकानं सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात