मुंबई, 16 ऑगस्ट : पाठीवर एक झाडाचं पान कोसळताच आभाळ कोसळलं म्हणून पळणाऱ्या भित्र्या सशाची (Rabbit) गोष्ट आपणा सर्वांना माहितीच आहे. अशाच एका सशावर (Rabbit video) आकाशातून खरंच मृत्यू आला पण त्याने न घाबरता मोठ्या हुशारीने या मृत्यूलाही चकवा दिला आहे (Attack on Rabbit) .
ज्या सशाला आपण भित्रा म्हणतो त्याने निर्भीडपणे मृत्यूचा सामना केला आणि त्याने आपला जीव वाचवला आहे. टुणटुण उड्या मारत वेगाने धावणाऱ्या या सशाने आपल्या एका उडीतच कमाल केली आहे. नेमकं काय घडलं ते व्हिडीओत पाहा.
Believe in yourself. You are braver than you think. pic.twitter.com/FNCdAm5H5d
— Susanta Nanda IFS (@susantananda3) August 16, 2021
व्हिडीओत पाहू शकता नेहमीप्रमाणेच सशा टुणटुण उड्या मारत जाताना दिसतो आहे. पण तो त्याचवेळी सावधही आहे. फक्त आजूबाजूला, मागेपुढे नाही तर अगदी वरदेखील त्याचं लक्ष आहे. त्यामुळेच आपला मृत्यू आपल्या जवळ येत आहे, हे त्याल समजताच तो अलर्ट झाला.
हे वाचा - मासे पकडता पकडता समोर आली मगर आणि... धडकी भरवणारा VIDEO
सशाचा मृत्यू आला होता तो बहिरी ससाणाच्या रूपाने. हा पक्षी सशाला पाहताच वेगाने त्याच्या दिशेने त्याची शिकार करायला झेपावला. तो जितक्या वेगाने आला तितक्याच वेगाने सशानेही डाव पलटून लावला. म्हणजे बहिरी ससाणा जशा जमिनीच्या दिशेने आला तशी सशाने वरच्या दिशेने उडी घेतली. त्यामुळे बहिरी ससाणा जमिनीच्या ससाणाच्या तावडीत ससा सापडला नाही. ससा उंच उडी घेऊन दुसऱ्या दिशेने गेला आणि तिथून पळत सुटला. बहिरी ससाणा मात्र मग पाहतच राहिला.
हे वाचा - Shocking! धड गायब, मध्यरात्री पळताना दिसले फक्त 2 पाय; Video पाहून फुटेल घाम
आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटवर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wild animal