वॉशिंग्टन, 16 ऑगस्ट : अनेकांना मासे (Fishing) पकडायला आवडतं. स्वतः मासे पकडून खाण्याची मजा काही औरच असते. असेच काही लोक मासे पकडायला गेले. पण मासे पकडता पकडता समोर मगर (Crocodile) आली. अमेरिकेच्या (America) फ्लोरिडातील (Florida) अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ (Crocodile video) आहे.
सोशल मीडियावर मगरीचा हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. मासेमारी करताना अचानक मगर समोर आली आणि सर्वांना धडकीच भरली.
View this post on Instagram
एका तळ्यात मासे पकडायला गेले. पण तिथं मगरही असेल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. काही जण मासे पकडत आहेत आणि काही जण व्हि़डीओ बनवत आहेत. छोटे छोटे मासे गळाला लागले. त्यानंतर हळूच पाण्यातून कोणीतरी डोकावत असल्याचं दिसलं. ती चक्क मगर होती. त्या पाण्यात मगर असेल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती.
हे वाचा - 113 किलोच्या 22 फूट लांब सापला खांद्यावर घेऊन चालू लागला अन्...; Shocking Video
मगरीला पाहताच सर्वजण घाबरून मागे हटतात. या सर्वांचं नशीब बलवत्तर म्हणून त्यांना काही झालं नाही. त्यांना वेळीच मगर दिसली आणि ते सावध झाले. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crocodile, Viral, Viral videos