Home /News /viral /

रात्रीच्या अंधारात घरात शिरला बिबट्या अन्...; धडकी भरवणारा VIDEO आला समोर

रात्रीच्या अंधारात घरात शिरला बिबट्या अन्...; धडकी भरवणारा VIDEO आला समोर

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यात रात्रीच्या अंधारात एक बिबट्या घरात शिरताना दिसतो.

    नवी दिल्ली 01 सप्टेंबर : अनेक भयानक प्राणी जंगलात राहतात. पण त्यांच्यामध्ये बिबट्या वेगळा आहे. आपल्या सर्वांना बिबट्याची हुशारी आणि चपळता चांगलीच माहिती आहे. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल (Viral Videos of Leopard) होतात, जे पाहून हे समजते की खरं तर बिबट्यासारखा प्राणी संपूर्ण जंगलात शोधूनही सापडणार नाही. मात्र काही वेळा असे काही व्हिडिओ पाहायला मिळतात, जे पाहून सगळेच थक्क होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यात रात्रीच्या अंधारात एक बिबट्या घरात शिरताना दिसतो. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ही घटना कर्नाटकच्या बांदीपूर येथील असल्याचं म्हटलं जात आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की एका घराचा दरवाजा उघडा असल्याचं पाहून बिबट्या अतिशय सावधगिरीनं घरात प्रवेश करतो. मात्र, घरात शिरल्यानंतर त्याला धोका जाणवताच तो माघारी पळतो. VIDEO : ड्रोनवर हल्ला करण्यासाठी पाण्याबाहेर आली मगर पण...; पाहा पुढे काय घडलं हा व्हायरल व्हिडिओ हैराण करणारा आहे. एका यूजरनं लिहिलं, की माणूस जंगल कापून आपलो घर बनवतो त्यामुळे जंगली प्राणी मानवी वस्तीतच येणार. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की हे दृश्य अतिशय भीतीदायक आहे. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. यासोबतच अनेकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे. धोकादायक विषारी पूल, पाण्यात उतरलेले जळून खाक, जवळ गेलेल्या महिलेला झाली शिक्षा हा व्हिडिओ @WildLense_India या ट्विटर अकाऊंटवरून मंगळवारी शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलं, की दावा केला जात आहे, की ही क्लिप बांदीपूर विंडफ्लावर येथील आहे. यात स्क्रीनवर 31 ऑगस्ट तारीख आणि 4 वाजल्याचं दिसत आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Leopard, Video Viral On Social Media

    पुढील बातम्या