मराठी बातम्या /बातम्या /Viral /

गेट बंद असतानाही बिबट्याने साधला डाव, घरात घुसून पाळीव कुत्र्याला पळवलं; पाहा LIVE VIDEO

गेट बंद असतानाही बिबट्याने साधला डाव, घरात घुसून पाळीव कुत्र्याला पळवलं; पाहा LIVE VIDEO

पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा खतरनाक हल्ला.

पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा खतरनाक हल्ला.

पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा खतरनाक हल्ला.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 25 डिसेंबर : आपल्या घरात कुणी घुसू नये, यासाठी घराचा मुख्य दरवाजा तर असतोच पण काही लोक घराच्या आवारात एक भक्कम असा गेटही बसवून घेतात. पण सुरक्षेसाठी लावलेला असा गेटही एका कुत्र्याला वाचवू शकला नाही. गेट बंद असतानाही बिबट्या (Leopard video) घरात घुसला आणि त्याने पाळीव कुत्र्यावर (Pet dog video) पळवून नेलं आहे (Leopard attack on dog video). बिबट्याने कुत्र्यावर (Leopard dog video) केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बिबट्याने कुत्र्यावर केलेला हा हल्ला घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. जो पाहूनच धडकी भडते. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. जो खूपच खतरकना आहे. व्हिडीओत पाहू शकता गेटकडे पाहत एक कुत्रा भुंकताना दिसतो आहे. त्याला गेटसमोर काहीतरी दिसलं म्हणूनच तो तिथं पाहून मोठमोठ्याने भुंकतो आहेत. इतक्यात त्याला असं काही दिसतं की तो भुंकतच तिथून पळून मागे जातो. काही वेळाने गेटवर एक बिबट्या दिसतो. गेट बंद असताना त्यावरून उडी मारून बिबट्या घराच्या अंगणात येतो, तो आत घुसतो. ज्या दिशेने कुत्रा धावत गेला त्याच दिशेने बिबट्याही जातो. यानंतर व्हिडीओत फक्त एक गेट दिसतो पण कुत्र्याचा आवाज ऐकू येतो.  थोड्या वेळाने बिबट्या पुन्हा येतो. त्यावेळी त्याच्या जबड्यात तोच कुत्रा असतो, जो काही वेळापूर्वी गेटकडे पाहून भुंकत होता. बिबट्या संधी साधून कुत्र्यावर हल्ला करतोच. त्यानंतर संरक्षक भिंतीवरून उडी मारून तिथून तो कुत्र्याला घेऊन पळून जातो. हे वाचा - Shocking video! एका हातात तोंड एका हातात शेपटी; जिवंत सापावरूनच मारल्या उड्या परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर आणखी एक ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, काही जणांसाठी हे असामान्य दृश्य असेल. पण कित्येक डोंगराळ भागात बिबट्या अशी कुत्र्यांची शिकार करतात. त्यामुळे स्थानिक लोक आपल्या पाळीवर कुत्र्यांवर लोखंडाची कॉलर ठेवतात ज्यामुळे त्यांचा जीव वाचेल. तसंच कित्येक क्षेच्रात असे भटके कुत्रे बिबट्यांसाठी मोठी समस्या आहे.
First published:

Tags: Dog, Leopard, Pet animal, Viral, Viral videos, Wild animal

पुढील बातम्या