मराठी बातम्या /बातम्या /Viral /एका हातात तोंड दुसऱ्या हातात शेपटी, चक्क जिवंत सापाला दोरीसारखं धरून मारल्या उड्या; भयंकर आहे हा VIDEO

एका हातात तोंड दुसऱ्या हातात शेपटी, चक्क जिवंत सापाला दोरीसारखं धरून मारल्या उड्या; भयंकर आहे हा VIDEO

सापासोबत जीवघेणा खेळ करताना दिसला तरुण.

सापासोबत जीवघेणा खेळ करताना दिसला तरुण.

सापासोबत जीवघेणा खेळ करताना दिसला तरुण.

मुंबई, 25 डिसेंबर : साप (Snake video) म्हटलं तरी आपल्याल धडकी भरते. समोर साप दिसला तरी घाम फुटतो. अशाच सापाला हातात दोरीसारखं धरून एका तरुणाने चक्क उड्या मारल्या आहेत (Jumping rope with snake). सापासह दोरीउड्या मारणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. त्याचा खतरनाक खेळ, जीवघेणी डेअरिंग पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. तर काहींनी संतापही व्यक्त केला आहे (Snake jumping rope video).

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सापाला दोरी बनवत त्यावरून एक तरुण दोरीउड्यांवर उड्या मारावा तसा उड्या मारताना दिसला.

व्हिडीओत पाहू शकता तरुण दोरीउड्या मारताना दिसतो आहे. पण त्याने उडी मारण्यासाठी हातात घेतलेली दोरी नाही तर चक्क एक जिवंत साप आहे. एका हातात सापाचं तोंड आणि दुसऱ्या हातात सापाची शेपटी धरत तरुणाने सापाची दोरी बनवली आणि त्यावरून तो मजेत उड्या मारू लागला.

व्हिडीओ पाहताना आपल्याला अक्षरशः घाम फुटतो. पण या तरुणाच्या चेहऱ्यावर बिलकुल भीती दिसत नाही. तो बिनधास्तपणे हसत हसत उड्या मारताना दिसतो. यावेळी एका हातातून साप सुटतो आणि तो खाली पडताच त्याच्या पायांना विळखाही घालतो. त्यावेळी तरुण पायातील सापाचा विळखा सोडवतो आणि त्याला पुन्हा आपल्या हातात धरून मानेत टाकून चालू लागतो.

हे वाचा - So cute! रस्ता ओलांडताना हत्तीने केला 'गोड इशारा'; VIDEO ने वेधलं सर्वांचं लक्ष

हा व्हिडीओ महाराष्ट्रातील पालघरमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सन हैराण तर झालेच आहेत. पण सापासोबत असं काही करताना पाहून त्यांच्या संतापही झाला आहे. या तरुणावर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर होऊ लागली आहे.

First published:
top videos

    Tags: Shocking viral video, Snake, Snake video, Viral, Viral videos