पाण्यात पडलेल्या कुत्र्याचा दुसऱ्या श्वानानेच वाचवला जीव, घटनेचा VIDEO VIRAL

पाण्यात पडलेल्या कुत्र्याचा दुसऱ्या श्वानानेच वाचवला जीव, घटनेचा VIDEO VIRAL

एका श्वानाने स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या पोमेरेनियन (Pomeranian ) प्रजातीच्या एका श्वानाला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स या कुत्र्याच्या शहाणपणाचं आणि हिंमतीचे कौतुक करत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 22 एप्रिल : एखाद्या प्राण्याने माणसाचा किंवा दुसऱ्या प्राण्याचा जीव वाचवल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या असतील. सोशल मीडियावर (social media) अशा बऱ्याच घटनांचे व्हायरल व्हिडिओ बघायला मिळतात.  अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत एका श्वानाने स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या पोमेरेनियन (Pomeranian ) प्रजातीच्या एका श्वानाला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स या कुत्र्याच्या शहाणपणाचं आणि हिंमतीचे कौतुक करत आहेत. तसंच यापैकी पाण्यात पडलेला कुत्रा ‘चकी’ हा खूप क्यूट असल्याचंही नेटिझन्स म्हणत आहे.

जीव वाचवणाऱ्या कुत्र्याचं नाव जेस्सी आहे. त्याने 15 वर्षांच्या चकी या पाण्यात पडलेल्या पोमेरेनियन कुत्र्याचा (Dog) जीव वाचवला आहे. ही घटना जोहान्सबर्गमधील असून घरातील सीसीटीव्ही कॅमेरात (CCTV Camera) कैद झाली आहे. हे दोन्ही कुत्रे बायरन थनरेयन आणि मेलिसा थनरेयन या दाम्पत्याचे आहेत. बायरनने हा व्हिडिओ फेसबूकवर शेअर केला आहे.

कैद्यांना मांजर पुरवणार होतं Drugs, तुरुंगातील अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश

व्हिडिओत दिसतंय की, चकी पुलाच्या खूप जवळ उभा असतो आणि थोड्याच वेळात तो घसरून पाण्यात पडतो. पाण्यात पडल्यानंतर चकी घाबरतो आणि हातपाय मारून पाण्यात तरंगण्याचा प्रयत्न करत असतो. याचदरम्यान, जेस्सी तिथे त्याला वाचवण्यासाठी येतो. चकीला पाहिल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी तो प्रयत्न सुरू करतो. तब्बल ३४ मिनिटं जेस्सी चकीला वाचवण्यासाठी पुलाच्या भोवताली फिरत असतो. तोंडात धरुन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. अखेर चकीला दातांच्या मदतीने तोंडात धरून पाण्यातून काढण्यात यशस्वी ठरतो.

ही घटना घडली तेव्हा बायरन आणि मेलिसा घरी नव्हते. ते परतल्यानंतर दोन्ही कुत्रे त्यांना भिजलेले दिसले. तेव्हा त्यांनी घरातील सीसीटीव्ही चेक केले आणि त्यांना कळलं की चकी पूलमध्ये पडला होता. त्यानंतर बायरनने हा व्हिडिओ फेसबुकवर (Facebook) शेअर केला. हा व्हिडिओ अगदी कमी वेळात प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी जेस्सीच्या हुशारकीचे भरभरून कौतूक केले. तर, चकी सुखरुप आहे की नाही याबद्दल कमेंटच्या माध्यमातून जाणून घेतले. दरम्यान, अशी घटना पुन्हा होऊ नये, यासाठी या दाम्पत्याने बाहेर जाताना पूल झाकून जाण्याचा निर्णय घेतला आहे. जेस्सीच्या हुशारीमुळे आणि त्याने राखलेल्या प्रसंगावधानामुळे चकीचा जीव वाचला. प्राणीदेखील इतरांची मदत करून जीव वाचवतात, हेच या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळाले.

Published by: Kiran Pharate
First published: April 22, 2021, 3:56 PM IST

ताज्या बातम्या