मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आईच्या डोळ्यादेखत पिल्लाला जबड्यात धरून बिबट्या पसार; मन हेलावणारा VIDEO

आईच्या डोळ्यादेखत पिल्लाला जबड्यात धरून बिबट्या पसार; मन हेलावणारा VIDEO

हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल.

हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल.

आईने पिल्लाला वाचवण्यासाठी धडपड केली पण...

 मुंबई, 24 ऑगस्ट : माणूस असो, प्राणी असो किंवा पक्षी. त्यांच्यातील आईचं (Mother) प्रेम (Mother), माया ही सारखीच असते. जी आपल्या पिल्लांवर संकट येताच कुणाशीही भिडू शकते (Animal mother). अशाच पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या एका आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल.

नीलगायीचा (Nilgai) हा व्हिडीओ  (Nilgai Video) आहे. जिच्या पिल्लावर तिच्यासमोरच बिबट्याने हल्ला (leopard attack on nilgai) केला आणि तिच्या डोळ्यादेखत जबड्यात धरून तो पळून गेला. तिने आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी धडपड केली पण त्याचा काहीच उपयोग झाला आहे.

" isDesktop="true" id="596375" >

व्हिडीओत पाहू शकता नीलगाय आपल्या पिल्लासोबत आहे. तिथं एक बिबट्या येतो आणि नीलगायीसमोरच तिच्या पिल्ला पळवतो.

हे वाचा - बापरे! महाबळेश्वरच्या रस्त्यावर गाड्यांसमोर आले 2 वाघ; पाहा थरारक VIDEO

नीलगायीचं पिल्लू जोरजोरात ओरडतं. आपल्या पिल्लासाठी नीलगाय बिबट्याच्या मागे पळत सुटतो. तो तिच्या पिल्लाला जबड्यात धरून झाडावर चढतो. नीलगाय कितीतरी वेळ झाडाखाली बिबट्याची वाट पाहत असते. पण बिबट्या संधी साधत तिथूनसुद्धा फरार होतो.

हे वाचा - Bikini घालून बीचवर करत होती योगा; तरुणीसोबत असं काही घडलं की पाहून बसेल धक्का

नीलगाय बिचारी पाहतच राहते. तिच्या डोळ्यासमोर तिचा पिल्लू बिबट्याची शिकार होतो. त्याला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी ती शक्य ते सर्व प्रयत्न करते. पण आपल्या पिल्लाचा जीव काही ती वाचवू शकत नाही. एका युट्यूब युझरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Leopard, Other animal, Viral, Viral videos, Wild animal