मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बापरे! महाबळेश्वरच्या रस्त्यावर गाड्यांसमोर आले 2 वाघ; आनंद महिद्रांनी शेअर केला थरारक VIDEO

बापरे! महाबळेश्वरच्या रस्त्यावर गाड्यांसमोर आले 2 वाघ; आनंद महिद्रांनी शेअर केला थरारक VIDEO

रस्त्यावर आले वाघोबा.

रस्त्यावर आले वाघोबा.

महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर फिरताना दिसले दोन वाघ.

  • Published by:  Priya Lad

महाबळेश्वर, 23 ऑगस्ट : वाघ (Tiger) म्हटलं तरी घाम फुटतो. असा वाघ तुमच्यासमोर अचानक आला तर काय होईल. त्यामुळे सावध राहा, आता महाबळेश्वरच्या (Mahabaleshwar tiger) रस्त्यावरच वाघ (Tiger on road) फिरताना दिसले आहेत. आनंद महिद्रांनी वाघांचा हा थरारक व्हिडीओ (Tiger video) शेअर केला आहे.

महाबळेश्वर-पाचगणी हायवेवर वाघ दिसले (Tiger on mahabaleshwar panchgani road). रात्रीच्या वेळी दोन वाघ रस्त्यावर आले आणि सर्वांची घाबरगुंडी उडाली. फक्त व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल.

व्हिडीओत पाहू शकता, रस्त्याच्या एका बाजूने झाडाझुडूपातून दोन वाघ बाहेर पडताना दिसतात. त्यापैकी एक वाघ रस्त्यावर येतो. रस्ताच्या दुसऱ्या बाजूला समोर एक बाईक उभी आहे, त्या बाईकजवळ हा वाघ जातो. जणू काही तो आपल्या शिकाराच्याच शोधात आहे.

हे वाचा - वृद्ध आईला अमानुष मारहाण करत होता मुलगा; कुत्र्यानं वाचवला महिलेचा जीव, VIDEO

या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी या वाघाला पाहिलं आणि त्यांच्या तोंडचं पाणीच पळालं.  दोन्ही बाजूंनी गाड्या थांबल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. थोडं रस्त्यावर फिरून हा वाघ पुन्हा रसत्याच्या कडेला गेला. त्यानंतर हळूहळू तो पुन्हा झाडांमध्ये घुसला.

हे वाचा - VIDEO: नागाला बहिणीकडून राखी बांधून घेत होता; सर्पदंशानं सर्पमित्राचा मृत्यू

हे दृश्यं जुनं नाहीये बरं का. तर या पोस्टनुसार 19 ऑगस्टचंच हे दृश्यं आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जर तुम्ही प्रवास करणार असाल, तर सावधान राहा. इथं फिरतायेत वाघोबा. इथं गाडीतून खाली बिलकुल उतरू नका.

First published:

Tags: Mahabaleshwar, Tiger