जाहिरात
मराठी बातम्या / Viral / दबक्या पावलांनी येत बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार, Video पाहून उडेल थरकाप

दबक्या पावलांनी येत बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार, Video पाहून उडेल थरकाप

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेली दृश्ये कोणालाही आश्चर्यचकित करू शकतात. हा व्हिडीओ बिबट्याशी संबंधित आहे. ज्यामध्ये काही लोक उघड्यावर खाटांवर झोपलेले दिसत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 मे : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा काही नेम नाही. येथे कधी प्राण्यांशी संबंधीत तर कधी एखाद्या धोकादायक क्षणा संबंधीत व्हिडीओ पाहायला मिळतात. तर काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ हा अंगावर काटा आणणारा आहे. या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेली दृश्ये कोणालाही आश्चर्यचकित करू शकतात. हा व्हिडीओ बिबट्याशी संबंधित आहे. ज्यामध्ये काही लोक उघड्यावर खाटांवर झोपलेले दिसत आहेत. त्यांच्या मागे अनेक ट्रकही उभे आहेत. त्यामुळे ते सर्व ट्रकचालक आहेत. त्यांच्या शेजारी एक कुत्राही झोपला आहे. तेवढ्यात अचानक एक बिबट्या घटनास्थळी येतो आणि हळूहळू कुत्र्यापर्यंत पोहोचतो. जंगली प्राण्यांना पाळणं महागात पडलं, मांस घालायला गेला आणि त्याची उरली 2 हाडं काही वेळातच बिबट्याने कुत्र्याला आपल्या तोंडाने पकडलं आणि तेथून पळ काढला.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, शेजारी झोपलेली व्यक्ती उठली. काहीतरी गडबड झाल्याचे त्याला जाणवते. पण त्याला झोपेत आधी काही कळतच नाही. पण हा संपूर्ण प्रकार जवळील सीसीटीव्हीमध्ये मात्र कैद झाला आहे. नशिबाने या बिबट्याने तेथे असलेल्या कोणत्याही माणसावर हल्ला केला नाही. या व्हिडीओवर नेटकरी जोरदार कमेंट करत आहेत.

जाहिरात

ही घटना 15 मे रोजी पुण्यातील जुन्नर शहरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. हे ऍनिमल रेस्क्यू सेंटर RESQ चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक नेहा पंचमिया यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल @neha_panchamiya वरून शेअर केले आहे. सुमारे तीन मिनिटांचा हा व्हिडीओ खूपच भयावह आहे आणि सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हेडलाईन बनत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात