नवी दिल्ली, 25 मे : आतापर्यंत तुम्ही प्राण्यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. जगभरात असे कितीतरी प्राणी, जीव आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीही नाही. हे जीव दिसायलाही विचित्र असतात. अशाच एका जीवाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या जीवाला पाहिल्यावर तुमच्या अंगाचं पाणी पाणी होईल.
एका विचित्र जीवाने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या जीवाला पाहिल्यानंतर अंगावर अक्षरशः काटा येतो. कदाचित पुन्हा या जीवाकडे तुम्हाला पाहावंसंही वाटणार नाही. इतका हा जीव विचित्र आहे. ट्विटर अकाऊंवर या जीवाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
@OTerrifying नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
Shocking Video! भुकेल्या व्यक्तीने कचाकचा चावला जिवंत साप; पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता जमिनीवर हा जीव दिसतो आहे. जो सापासारखा लांबलचक आहे. त्याने वेटोळे घातलेले आहेत. पण नीट पाहता तो साप तर वाटत नाही. तो पुढे सरकतो असं वाटतं आहे. त्याचं असंख्य पाय आहेत. पण त्याचं शरीरही तुटक तुटक दिसत आहे. त्याच्या शरीरातून पाणीही बाहेर पडल्यासारखं वाटत आहे. हा जीव पाहिल्यावर आपल्यालाही धडकी भरेल. कोण आहे हा विचित्र जीव, तो कुठे सापडला, हा जीव धोकादायक आहे का?, असे असंख्य प्रश्न याला पाहिल्यानंतर आपल्या डोक्यात येतात.
असे प्राणी ज्यांचं रक्त लाल नाही, 6 व्या नंबरचा फोटो पाहून व्हाल अवाक्
हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.कुणी याला भीतीदायक म्हटलं आहे तर कुणी घृणास्पद.
Does anybody know what this is? pic.twitter.com/eUBCLhtLAJ
— OddIy Terrifying (@OTerrifying) May 25, 2023
तुम्हाला या जीवाला पाहिल्यावर काय वाटलं आणि हा जीव कोण आहे, हे तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wild animal