नवी दिल्ली, 2 मे : जंगलात प्राण्यांना राहण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. लहान प्राण्यांना मोठ्या हिंस्त्र प्राण्यांपासून सतत सावध राहावं लागतं. पाण्यात आणि जमिनीवर शिकार करणारे बिबट्या (Leopard) आणि मगर (Crocodile) दोघेही हिंस्त्र प्राणी, एक क्षणात कोणत्याही प्राण्याची शिकार करण्यात तरबेज आहेत. परंतु अनेकदा बिबट्याने मगरीची शिकार केल्याचं समोर आलं आहे. असाच एक बिबट्याने भल्यामोठ्या मगरीची एका झडपेतच शिकार केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तलावात एक बेट तयार झालं आहे, या बेटावरच एक मगर आरामात झोपल्याचं दिसतंय. त्यावेळी एका बिबट्याची नजर त्या मगरीवर जाते आणि तिची शिकार करण्यासाठी बिबट्या तलावात उतरतो. दबक्या पावलांनी तो मगर असलेल्या बेटाजवळ हळू हळू येतो आणि काही समजायच्या आतच मगरीवर झडप घालतो. बिबट्याने केलेल्या शिकारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
(वाचा - हरण तावडीत सापडलं पण शिकार न करता बिबट्यानेच ठोकली धूम;नेमकं काय घडलं पाहा VIDEO )
मगरीला काही समजायच्या आत बिबट्या मगरीवर झडप घालून आपल्या जबड्याने मजबूत पकड करतो आणि खेचत पाण्यातून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो. यादरम्यान मगर बिबट्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करते, मात्र बिबट्याच्या मजबूत पकडीतूम मगर सुटू शकत नाही.
شاهد كيف الجاكوار يصطاد التمساح حيث انقض الجاكوار بكل خفة و تسديد على التمساح فلم يعد الاخير قادرا على ان يحرك ساكناً.
— غرائب الحيوانات (@aw_206) February 10, 2021
قوة و شجاعة و ثقة في الهجوم#غرائب_الحيوانات pic.twitter.com/e1YalSenTM
(वाचा - नदीबाहेर असेलल्या मगरीवर सिंहाचा हल्ला; पुढे काय झालं पाहा VIDEO )
हा व्हिडीओ @aw_206 नावाच्या एका ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अनेक व्ह्यूज मिळाले असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.