नवी दिल्ली 04 मार्च : सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र यातही जे व्हिडिओ लोकांना सर्वात जास्त आवडतात, ते प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ असतात. विशेषतः जंगलातील शिकारीचे व्हिडिओ पाहणं लोकांना जास्त आवडतं. तुमच्यासाठी आम्ही वन्य प्राण्यांच्या लढाईचा असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये एक बिबट्या सिंहीणीशी लढताना दिसतो. वाघाला पाहून हरीण सुन्न, पुढं जे झालं ते हृदय पिळवटणारं, पाहा VIDEO कॅट फॅमिलीचे प्राणी सर्वोत्तम शिकारी मानले जातात. त्यापैकी काही खूप शक्तिशाली आहेत आणि काही खूप वेगवान आहेत. विशेषत: बिबट्याबद्दल बोलायचं झाले तर, तुम्ही अनेकवेळा तो इतर प्राण्यांवर डोळसपणे हल्ला करताना पाहिला असेल. मात्र, आज आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत, त्यात बिबट्या सिंहीणीसमोर घाबरून पळताना दिसत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटाही येईल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बिबट्या आणि एक भयंकर सिंहीण एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला तो सिंहीणीशी लढतो पण बिबट्याला आपण जिंकू शकणार नाही असं वाटताच तो शक्य तितक्या वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न करतो. आता स्पर्धा सिंहीणीशी आहे, त्यामुळे ती बिबट्याला धावत जाऊन पुन्हा पकडते. मात्र, शेवटी तो कसा तरी आपला जीव वाचवण्यात यशस्वी होतो आणि जवळच्या झाडावर चढतो.
हा भयावह व्हिडिओ पाहून लोक म्हणाले, की बिबट्या नशीबवान होता. अन्यथा त्याचं जिवंत वाचणं कठीण होतं. हा व्हिडिओ 28 फेब्रुवारीला wildtrails.in या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आला होता, ज्याला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि दोन हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर कमेंट करत लोकांनी बिबट्याच्या समजदारीचं कौतुक केलं आहे.