नवी दिल्ली, 3 मार्च : लोकांना कायमच वन्य जीवनाविषयी कुतुहल असतं. प्राण्यांना पहायला आणि त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकजण तयार असतात. वन्य जीवनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बरेचजण जंगल सफारीसाठीही जातात. प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. हरिण आणि वाघाचा एख व्हिडीओ समोर आला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये जंगलाच्या मध्यभागी एक वाघ शांतपणे बसलेला दिसतो. यादरम्यान तो समोरून येणाऱ्या हरणाकडे टक लावून बघताना दिसतो. यादरम्यान समोरून येणार्या हरणाला महाकाय वाघाला पाहून घाम फुटतो. हरिण जाग्यावर सुन्न होऊन उभं राहतं. तेवढ्यात वाघ त्याच्या दिशेने चालायला लागतो. जसा जसा वाघ हरणारडे वाटचाल करतो तसतसं हरिण आणखीनच घाबरताना दिसत आहे. वाघ अगदी जवळ आल्यावर हरिण तेथून धूम ठोकतो.
The tiger is a monk. It won't bother you, or be bothered by you. It tries to maintain its composure as much as it can. Even if you are around it, it will most likely be unfazed. And even when a tiger expresses its aggression, it is mock. It's a construct. pic.twitter.com/FcxsduIMx2
— Ramesh Pandey (@rameshpandeyifs) March 1, 2023
आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये सांगितले की, वाघ एक साधू आहे, जो तुम्हाला त्रास देणार नाही. ते शक्य तितके संयम राखण्याचा प्रयत्न करतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला पाहून सगळेच आश्चर्यचकित होत आहेत.
दरम्यान, वाघ आणि हरणाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला असून या व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंट येत आहेत. अगदी काही सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. यापूर्वीही सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये कधी कधी भयंकर हल्ल्यांचेही व्हिडीओ पहायला मिळतात.