Home /News /viral /

जेव्हा आपसात भिडले ब्लॅक पँथर आणि बिबट्या; खतरनाक फाईटचा शेवट बघाच, VIDEO

जेव्हा आपसात भिडले ब्लॅक पँथर आणि बिबट्या; खतरनाक फाईटचा शेवट बघाच, VIDEO

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकमेकांशी भिडताना दिसत आहेत (Black Panther and Leopard Fight Video).

  नवी दिल्ली 19 मार्च : ब्लॅक पँथर आणि बिबट्या हे दोन्ही प्राणी सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये गणले जातात. ब्लॅक पँथर आणि बिबट्या हे दोघेही वेगवान आणि खतरनाक हल्ल्यासाठी ओळखले जातात. हे दोन्ही प्राणी जेव्हा एखाद्याला आपल्या तावडीत घेतात तेव्हा त्यांना जीवे मारूनच सोडतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा हे दोन प्राणीच एकमेकांसोबत भिडतात तेव्हा ती लढाई कशी असेल? आज आम्ही तुम्हाला ब्लॅक पँथर आणि बिबट्याच्या लढतीचा असा व्हिडिओ दाखवणार आहोत, जो तुम्ही याआधी कदाचितच पाहिला असेल. या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. VIDEO - 3-3 कोब्रांसोबत तरुणाचा जीवघेणा खेळ; शेवटी जे घडलं ते पाहून घाम फुटेल व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकमेकांशी भिडताना दिसत आहेत (Black Panther and Leopard Fight Video). हळूहळू हे भांडण इतकं मोठं बनतं की त्यांचे दोघांचे आणखी एक-एक साथीदारही या भांडणात सहभागी होतात. मात्र असं होऊनही हा संघर्ष संपत नाही.
  दोन बिबट्या आणि दोन ब्लॅक पँथर्सची जोडी आता आपली आपली टीम बनवून लढू लागते. सिंह, चित्ता, बिबट्या सहसा एकमेकांशी लढत नाहीत. हे भयंकर प्राणी इतर प्राण्यांना सोडून आपापसात भांडत असल्याचं दृश्य फार दुर्मिळ आहे.

  बाप रे बाप! घरातील बाथरूम शॉवरमध्ये दडून बसले होते 10 साप आणि अचानक...

  व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ wild_animal_shorts या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. जो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे, तर 2 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. ब्लॅक पँथर आणि बिबट्याच्या लढतीचा हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ब्लॅक पँथर आणि बिबट्याची ही लढत पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Leopard, Shocking video viral

  पुढील बातम्या