वॉशिंग्टन, 18 मार्च : साप कधी, कुठे, कसा येईल सांगू शकत नाही. टॉयलेटमध्ये साप लपून बसल्याची आणि चावल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील आता बाथरूममध्ये शॉवरमध्ये साप दडून बसल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सापांचा हा भयानक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात चक्क बाथरूममध्ये शॉवरमध्ये एक-दोन नव्हे तर बरेच साप दडून बसले होते. अचानक बाथरूममध्ये समस्या उद्भवली आणि तेव्हा ही धक्कादायक बाब समोर आली (Snake in bathroom shower). बाथरूममध्ये बऱ्याचदा काही ना काही समस्या असते. एका व्यक्तीला बाथरूम शॉवरमध्ये अशीच समस्या उद्भवली. नेमकं काय झालं आहे हे पाहण्यासाठी शॉवर उघडून पाहिला आणि धक्काच बसला. या शॉवरखाली चक्क साप दडून बसले होते. अमेरिकेच्या ओक्लाहोमातील ही घटना आहे. घरातील बाथरूमच्या शॉवरमध्ये समस्या असल्याने घरातील लोकांनी शॉवर दुरूस्त करायचं ठरवलं. त्यांनी प्लंबरला बोलावलं. नेमकं काय झालं आहे ते प्लंबरलाही समजेना. शेवटी त्याने शॉवर पॅनच्या खाली पाहायचं ठरवलं. शॉवर पॅन काढला आणि त्याच्याखाली खोदलं. तेव्हा तिथं जे दिसलं ते पाहून धक्काच बसला. हे वाचा - मजा करायला जंगलात गेला चिमुकला; अचानक समोर आला भयंकर प्राणी; काय घडलं पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता या खड्ड्यात किती साप दिसत आहेत. खड्डा खोदताच एक काळा साप खड्ड्यातून बाहेर आला. जो पाहताच कोब्रा वाटतो आहे.
शॉवर पॅनच्या खाली पाइपमध्ये जवळपास 10 साप होते. एक-दोन साप तर 5 फूट लांबीचे होते. व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.