व्हिडीओत पाहू शकता. जमिनीवर एक सुकलेलं पान पडलं आहे. एक व्यकी या पानाला हात लावतं, अचानक हे पान हलू लागतं. म्हणजे त्याच्यात जीव असावा तसं ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातं. पुन्हा ते जमिनीवर शांत पडून राहतं. ती व्यक्ती पुन्हा त्या पानाला हात लावते आणि काय पानाला चक्क पंखच फुटतात आणि ते उडू लागतं. करड्या रंगाच्या या पानावर रंगही दिसू लागतात. सुकलेल्या पानाचं रूपांतर चक्क सुंदर फुलपाखरात होतं. हे वाचा - शवासन करत होता मालक, छातीवर बसला कुत्रा आणि...; VIDEO पाहून तुम्हीही चक्रवाल तसं पाहायला गेलं तर हा व्हिडीओ म्हणजे एखादं मॅजिकच वाटेल. तशी ही मॅजिकच आहे पण ही हातचलाखी नाही तर हा नैसर्गिक चमत्कार आहे. निसर्गाची ही किमया आहे. तसं पानाचं रूपांतर फुलपाखरात होतं असं नाही. प्रत्यक्षातच हे पान नसून फुलपाखरूच आहे. ज्याचा एक भाग हा सुकलेल्या पानासारखा आहे तर दुसरा भाग हा रंगीत आहेत. हे वाचा - चमत्कार! बर्फाखाली दबलेला हा प्राणी 24 हजार वर्षांनंतरही सापडला जिवंत प्रत्येक पशू-पक्ष्याकडे आपल्या संरक्षासाठी, बचावासाठी एक विशेष क्षमता असते. जसं रंग बदलणारा सरडा, तसंच हे फुलपाखरू आहे. जे कुठे स्थिरावलेलं असताना पानासारखं होतं जेणेकरून कुणी त्याला सुकलेलं, निरुपयोगी पान समजून हात लावणार नाही.Natural camouflage - a survival mechanism pic.twitter.com/IY2suGfkuN
— Kiran Mazumdar-Shaw (@kiranshaw) June 8, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Viral, Viral videos