मुंबई : बाळाच्या जन्मानंतर त्याला जवळच्या लोकांकडूवन वेगवेगळे दागिने दिले जातात. यामध्ये बहुतांश लोक हे बाळाला चांदीचे दागिने घालतात. ज्यामध्ये पैंजण, कमरेतली साखळी, तोडे, ब्रेसलेट यांसारख्या वस्तूं दिल्या जातात. आपल्या देशात लहान मुलांनी धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या दागिने घालणे सामान्य आहे. पण कधी विचार केलाय का की बाळाला चांदीच्या वस्तू मुख्यता का दिल्या जातात?
भोपाळचे रहिवासी ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी लहान मुलांसंबंधीत काही महत्वाची माहिती दिली आहे. लहान मुलांसाठी चांदीचे दागिने घालणे कसे फायदेशीर आहे, याबाबत देखील त्यांनी माहिती सांगितली आहे.
Mangalsutra : लग्नात नववधूला उलटं मंगळसुत्र का घालतात? मुलीच ते का घालतात?
लहान मुलांना चांदीचे दागिने घालण्याचे फायदे
ज्योतिषशास्त्रानुसार लहान मुलांनी पायात पैंजण, गळ्यात चैन, हातात चांदीच्या बांगड्या इ. घातलं जातं चांदी ही चंद्राचा धातू मानली जाते. या व्यतिरिक्त विज्ञानाचा असा विश्वास आहे की, चांदी ही एक प्रतिक्रियाशील धातू आहे आणि शरीरातून सोडलेली ऊर्जा शरीरात परत करते.
या सर्वांशिवाय चांदीला जंतूनाशक धातू देखील मानले जाते. चांदीमध्ये रोगांशी लढण्याची क्षमता असते. अशावेळी अंगात चांदी धारण करावी.
चांदीमुळे रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. चांदी धारण केल्याने आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. असे मानले जाते की लहान मुलांना चांदी धारण केल्याने जंतू आणि रोग कमी होतात आणि मुले निरोगी राहतात.
चांदी धारण केल्याने मुलांच्या मानसिक विकासात कोणतीही कमतरता येत नाही असाही समज आहे.
चांदी ही मनाचा कारक मानला जातो. म्हणूनच लहान मुलाला चांदी धारण केल्याने त्याचा मानसिक विकास चांगला होतो आणि त्याचा त्याच्या मनावरही सकारात्मक परिणाम होतो. या सर्व कारणांमुळे लहान मुलांना चांदीच्या बांगड्या, कमर साखळी आणि पैंजण घातले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Silver, Small baby, Social media, Top trending, Viral