Home /News /viral /

तुमचं बालपण आणि शाळेतल्या दंगामस्तीची होईल आठवण, सेहवागने शेअर केला VIDEO

तुमचं बालपण आणि शाळेतल्या दंगामस्तीची होईल आठवण, सेहवागने शेअर केला VIDEO

शाळेत असताना अनेक खोड्या, दंगामस्ती प्रत्येकाने केलीच असेल. असाच एक व्हिडिओ भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने शेअर केला आहे.

    भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच बालपणाची आणि शाळेची आठवण होईल. शाळेतल्या खोड्या, गमती जमतींची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, सेहवागने ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओत शाळेमध्ये प्रार्थनेवेळी एक मुलगा हळूच लॉलीपॉप खाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये विद्यार्थी युनिफॉर्ममध्ये दिसत आहे. तो हात जोडून प्रार्थनेला उभा आहे. प्रार्थनेवेळी तो डोळे बंद करतो. तेव्हा हळूच तो अधून मधून लॉलीपॉप खाताना दिसतो. हा व्हिडिओ सेहवागने ट्विटरवर शेअर केला आहे. सेहवाग म्हणाला की, या मुलाची वेगळीच हवा आहे. याने जे केलं ते पाहून माझी आठवण झाली. सेहवागने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. ट्विटर युजर्स मुलाचे कौतुक करताना बालपणीच्या आठवणीसुद्धा शेअर करत आहेत. TikTok वर ट्रेंड होतोय या मुलीचा भन्नाट डान्स, पाहा VIDEO
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Virendra sehwag

    पुढील बातम्या