ही घटना चीनची आहे. वाघिणीने तिची तीन पिल्लं सोडली, ज्यांची नंतर लॅब्राडोर श्वानाद्वारे काळजी घेतली जात आहे. आता हा व्हिडिओ इंटरनेटवर लोकांची मनं जिंकत आहे. व्हायरल व्हिडिओ दाखवतो की तीन वाघांचे बछडे एका कुत्र्याभोवती कसे खेळत आहेत. त्यांना त्यांच्या आईने अज्ञात कारणास्तव सोडून दिलं आहे. या बछड्यांच्या आईने जन्मानंतर लगेचच त्यांना दूध देण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे. मगरीला पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला घडली आयुष्यभराची अद्दल, घटनेचा Shocking Video सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक लॅब्राडोर कुत्रा जमिनीवर बसला आहे आणि वाघिणीची पिल्ले त्याच्याभोवती फिरत आहेत. तिन्ही पिल्लं इकडे तिकडे उड्या मारत आहेत. प्राण्यांनी आपल्या पिल्लांना अशाप्रकारे सोडल्याची ही पहिली घटना नाही. प्राणी सहसा दोन किंवा अधिक पिल्लांना जन्म देतात आणि अधिक पिल्लांची काळजी घेणं शक्य होत नसल्याने जन्मताच ते आपल्या पिल्लांना सोडून देतात.Mess with the gator your going to get the teeth. pic.twitter.com/KkepRhIdic
— Jamie Gnuman197... (@JGnuman197) May 13, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Tiger, Video Viral On Social Media