मुंबई 20 ऑक्टोबर : सध्या लोकांचा कल ऑनलाईन शॉपिंगकडे जास्त वळला आहे. सणासुदीच्या काळात तर ऑनलाईन शॉपिंग कंपन्या आपल्याला भरभरुन डिस्काउंट्स आणि ऑफर्स देतात. ज्यामुळे अगदी घरबसल्या आपण कमी पैशात वस्तू मागवू शकतो. या वस्तु जेव्हा घरी येतात तेव्हा त्या नेहमीच एका बॉक्समध्ये पॅक करुन येतात. मग ती वस्तू अगदी लहान असू देत किंवा मग मोठी ती आपल्याला मोठ्या बॉक्समध्येच येते. पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की ऑनलाईन वस्तू मागवल्यावर ती ज्या बॉक्स पॅकिंगमधून येते तो बॉक्स ब्राऊन रंगाचाच का असतो? तो सफेद किंवा निळा, हिरवा अशा रंगात का येत नाही? नसेल माहित तर जास्त विचार करु नका आम्ही तुम्हाला ते जाणून घेण्यासाठी मदत करणार आहोत. हे ही वाचा : कोणीतरी गिफ्ट पाठवलं म्हणून तरुणीनं आनंदानं उघडलं, पण क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं म्हणून कुरिअर बॉक्स तपकिरी रंगाचे आहेत खरंतर हे पार्सल ज्या कुरिअर बॉक्समधून येते, तो डिलिव्हरी बॉक्स कार्डबोर्डचे किंवा पुठ्ठ्याचे बनलेले असतात, जो संपूर्ण कॉर्पस कागदाचा बनलेला आहे. आता तुम्हाला हे माहित असेल की नैसर्गिकरित्या आपल्याला झाडापासून कागद मिळते आणि ते कागद ब्लीच केलेले नाहीत, म्हणूनच ते तपकिरी रंगाचे आहेत. ऑनलाई कंपन्या हे वापरण्या मागचं कारण… तपकिरी हा कागदाचा नैसर्गिक रंग आहे. कागद नैसर्गिकरित्या तपकिरी असतो कारण तो झाडाच्या लाकडापासून, देठापासून आणि सालापासून बनवला जातो. त्यानंतर सफेद कागदासाठी आपण त्याला नैसर्गिक ब्लीच करतो जेणेकरून त्यावर सहज लिहिता येईल. पण आपल्याला पुठ्ठ्यावर काहीही लिहावे लागत नाही, त्यामुळे त्यावर ब्लीचिंग आवशक नसते. तसेच ब्लिचिंग प्रोसेस महागडी असल्यामुळे कागद पांढरे करण्यासाठी जास्त पैसे खर्च होतात. ज्यामुळे कमीत कमी पैशात तो बनवला जातो.
त्यामुळेच आपल्याकडे येणारे कुरिअर बॉक्स हे तपकिरी रंगाचे असतात. खरंतर आपण जेव्हा Amazon आणि Flipkart सारख्या कंपन्यांकडून वस्तू मागवतो, तेव्हा आपल्याला ती कमीत कमी पैशांमध्ये हवी असते आणि कोणताही ग्राहक पॅकिंगसाठी जास्त पैसे देऊ मागत नाही, ज्यामुळेच कंपन्या या कार्डबोर्डच्या ब्लीचिंगवर पैसे खर्च करत नाहीत आणि कमीत कमी पैशात बॉक्स विकत घेऊन किंवा बनवून ते आपल्यापर्यंत पोहोचवते.