मुंबई : बँकिंग व्यवहारात चेकचा वापर सामान्य आहे. यामुळे लोकांना पैसे काढणे आणि पैसे कोणालाही देणे शक्य होते. यामुळे चोरीची संभावना देखील कमी असते, त्यामुळे हा चेकचा व्यवहार हा सोयीस्कर मानला जातो. तसे पाहाता आज ऑनलाईल बँकिंगचा जमाना आहे, ज्यामुळे बहुतांश लोक चेक शिवाय देखील व्यवहार करतात. पण असं असलं तरी देखील काही गोष्टींसाठी चेक महत्वाचा आहेच. असे अनेक लोक आहेत, ज्यांना चेक जारी करण्याशी संबंधित काही तथ्यांची माहिती नाही. आम्ही तुम्हाला बँक चेकशी संबंधित अशा काही गोष्टींबद्दल सांगतो, ज्यामुळे तुम्हाला मोठ्या फसवणूक आणि तोट्यापासून वाचता येईल.
चेक अनेकदा व्यावसायिक किंवा वैयक्तिक व्यवहारांसाठी दिले जातात. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला चेकद्वारे पैसे देत असाल तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही पाहिले असेल की जेव्हा एखादी मोठी संस्था किंवा व्यापारी चेक जारी करतात. तेव्हा ते रक्कम लिहितात आणि त्याच्या पुढे ‘फक्त’ किंवा ‘only’. असं का लिहिलं जात. पण आता प्रश्न असा आहे की ते का लिहिलं जातं? रेल्वे स्टेशन ट्रेनचं असतात, मग काही स्टेशनसमोर ‘रोड’ का लिहिलं जातं? खरंतर चेकवरील रकमेच्या शेवटी फक्त’ किंवा ‘only’ लिहिण्याचा उद्देश संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी आहे. त्यामुळे रक्कम शब्दात लिहिल्यानंतर शेवटी फक्त लिहिली जाते. ज्यामुळे त्याच्या पुढे कोणीही दुसरी रक्कम लिहू शकणार नाही. समजा तुम्ही चेक देताना 25 हजार ची रक्कम लिहिली आणि त्याच्या शेवटी फक्त लिहिलं नाही, तर या परिस्थितीत दुसरी व्यक्ती आणखी काही रक्कम टाकून रक्कम वाढवू शकते. या कारणास्तव, तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता, म्हणून धनादेश जारी करताना, रकमेच्या शेवटी फक्त लिहिलेले आहे. त्याच वेळी, संख्यांमध्ये रक्कम टाकल्यानंतर /- हे चिन्ह वापरा. ज्यामुळे त्यासंख्येच्या पुढे देखील कोणी काही लिहू शकणार नाही.