जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Fact Check: खरंच 399 वर्षांची आहे जगातील सर्वात वृद्ध महिला? फोटो होतोय व्हायरल

Fact Check: खरंच 399 वर्षांची आहे जगातील सर्वात वृद्ध महिला? फोटो होतोय व्हायरल

Fact Check: खरंच 399 वर्षांची आहे जगातील सर्वात वृद्ध महिला? फोटो होतोय व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका अतिशय वृद्ध महिलेचा फोटो व्हायरल होत आहे. या महिलेचे डोळे पूर्णपणे आतमध्ये गेल्यासारखे दिसतात आणि तिची त्वचाही अगदी वेगळी दिसते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 06 मार्च : जगात आपल्या अनेक प्रकारचे विश्वविक्रम पाहायला मिळतात. अनेक अशी संस्थानं आहेत, जी पुरावा घेऊन या रेकॉर्ड्सला मान्यता देतात. यात जगातील सर्वात वृद्ध सदस्यांचाही एक कॉलम आहे (Oldest Person In World). या रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी व्यक्तीकडे जन्माचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर सध्या एका अतिशय वृद्ध व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. या व्यक्तीचे डोळे पूर्णपणे आतमध्ये गेल्यासारखे दिसतात आणि त्वचाही अगदी वेगळी दिसते. असा दावा केला जात आहे की ही जगातील सर्वात वृद्ध महिला आहे, जिचं वय 399 वर्ष आहे (Woman Of 399 Years) . Shocking! पोटात सुरू झाल्या तीव्र वेदना आणि ‘प्रेग्नंट’ झाला 46 वर्षांचा पुरुष या गोष्टीवर विश्वास ठेवायला बराच वेळ लागेल, मात्र खरंच या फोटोच्या आधारावर महिलेचं वय 399 वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे हे महिला मागील चार शतकांपासून जिवंत आहे. लोक या गोष्टीबद्दल आश्चर्य व्यक्त करत असतानाच आणखी एक बातमी समोर आली. यात असं म्हटलं गेलं की हा फोटो एका बौद्ध भिक्षूचा आहे, जो स्वतःला ममीमध्ये बदलत आहे. जेव्हा याबद्दल शोध घेतला गेला तेव्हा समजलं की हे दोन्ही फोटो एकाच व्यक्तीचे आहेत. अशात हे सिद्ध झालं की दोन्हीही फेक न्यूज आहेत. हे फोटो खरे आहेत, मात्र यात करण्यात आलेले दावे अगदी खोटे आहेत. एखादा व्यक्ती ४०० वर्ष जिवंत राहिल्यास शास्त्रज्ञांमध्येही उत्सुकता निर्माण होईल. आतापर्यंत मानवाचे कमाल वय 150 निश्चित करण्यात आले आहे. कोणी चारशे वर्षे जगला तर त्याच्या आधारे शास्त्रज्ञ अनेक संशोधन करू लागतील. मॉस्कोच्या इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स अँड टेक्नॉलॉजीचे संशोधक पीटर फेडीचेव्ह यांनी सांगितलं की, औषधे आणि चांगल्या आहाराच्या मदतीने एखाद्या व्यक्तीला निरोगी ठेवलं तरी काहीच वर्षे त्याचं आयुष्य वाढवता येईल. चारशे वर्षे अशक्य आहे. पत्नीशी खोटं बोलून घराबाहेर पडला माणूस, थेट गाठलं युक्रेन! युद्धात झालाय सहभागी @auyary13 नावाच्या युजरने या व्यक्तीचे फोटो टिकटॉकवर शेअर केले होते. ती या व्यक्तीची नात असल्याचं निष्पन्न झालं. लुआंग फो आय असं या व्यक्तीचं खरं नाव असून ते बौद्ध भिक्षू होते. त्यांचं खरं वय 163 किंवा ३९९ वर्ष नाही तर १०९ वर्षे आहे. ते थायलंडमध्ये राहतात आणि सध्या त्यांना आपला बराचसा वेळ रुग्णालयातच घालवावा लागतो. या वयातही ते आपली बहुतांश कामे स्वतः करतात. सध्या जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा किताब जपानच्या केन तनाका यांच्या नावावर आहे, ज्यांचे वय 119 वर्षे आहे. त्यांचा जन्म 2 जानेवारी 1903 रोजी झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात