Home /News /viral /

पत्नीशी खोटं बोलून घराबाहेर पडला हा माणूस, थेट गाठलं युक्रेन! युद्धात झाला आहे सहभागी

पत्नीशी खोटं बोलून घराबाहेर पडला हा माणूस, थेट गाठलं युक्रेन! युद्धात झाला आहे सहभागी

एका ब्रिटीश नागरिकानं (British Citizen in warzone) एक पाऊल पुढे टाकत युक्रेनला अनोख्या पद्धतीनं पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे त्याच्या कुटुंबीयांना याविषयी काहीही माहिती नसल्याचं समोर आलं आहे.

कीव्ह, 05 मार्च: युक्रेन (Russia Ukraine War) आणि रशियामधील युद्धस्थिती कायम आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून रशिया युक्रेनमधल्या प्रमुख शहरांवर हल्ला करत आहे. यामुळे युक्रेनमध्ये मोठी हानी झाल्याचं पाहायला मिळत आहे. युद्धामुळं एकीकडे युक्रेनमध्ये मोठी विनाशकारी स्थिती निर्माण झालेली असताना, दुसरीकडे रशियालाही या युद्धाचा मोठा फटका बसत आहे. दरम्यान, जगभरात या युद्धाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक लोक युक्रेनबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत. सोशल मीडियाच्या (Social Media on Russia Ukraine situation) माध्यमातूनही युक्रेनला पाठिंबा दर्शवला जात आहे. अनेकांनी आपापल्या देशात यु्क्रेनला पाठिंबा देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, एका ब्रिटीश नागरिकानं (British Citizen in warzone) एक पाऊल पुढे टाकत युक्रेनला अनोख्या पद्धतीनं पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे त्याच्या कुटुंबीयांना याविषयी काहीही माहिती नसल्याचं समोर आलं आहे. 'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, विरल (Wirral) येथे राहणारी एक व्यक्ती त्याच्या पत्नीला फिरायला जातो असं सांगून घराबाहेर पडली. त्यानंतर त्याने विमानप्रवास करत थेट पोलंड गाठलं. त्याने मेडायका गावातून सीमा ओलांडली आणि युक्रेनमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तो युक्रेनच्या सैन्याला मदत करण्यासाठी पोहोचला आणि रशियाविरुद्ध च्या युद्धात सामील झाला. हे वाचा-झेलेन्स्कींची हत्या की पुतिन यांची जाणार सत्ता? कोणत्या परिस्थितीत संपेल युद्ध? पत्नीला न सांगताच ही व्यक्ती पोहोचली युक्रेनला 'मी ब्रिटिश लष्कराचा (British Army) निवृत्त सैनिक आहे,' असं या व्यक्तीनं द सन या वेबसाइटसशी संवाद साधताना सांगितलं. 'मी सैन्यात दीर्घकाळ स्नायपर म्हणून काम केलं आहे. मी युक्रेनमध्ये आल्याचं ज्यावेळी माझ्या पत्नीला (Wife) समजेल तेव्हा ती माझ्यावर खूप नाराज होईल. त्यामुळे मी काही दिवसांनतर तिला युक्रेनमधून फोन करून ही गोष्ट सांगणार आहे. युक्रेन सैन्याची भूमिका योग्य आहे. लोकांनी या कठीण काळात युक्रेनियन नागरिकांना मदत केली पाहिजे',असं या व्यक्तीनं यावेळी सांगितलं. युक्रेनला मदत करण्यासाठी पोहोचली ही व्यक्ती या व्यक्तीनं सागितलं की, 'मी माझं आयुष्य जगलो आहे. सर्व कर्ज फेडलं आहे. तसेच पती आणि पित्याची सर्व कर्तव्य पार पाडली आहेत. त्यामुळे मी युक्रेनला मदत करण्यासाठी आलो आहे. सर्व काही नष्ट करण्याचा निर्धार असलेल्या आधुनिक काळातल्या हिटलरशी मी सामना करतोय,' असं मला वाटतं. हे वाचा-युक्रेनमध्ये शॉपिंग सेंटर लुटताना दिसले सामान्य नागरिक, दृश्य कॅमेऱ्यात कैद या व्यक्तीनं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं की, 'युक्रेनच्या लोकांना अनुभवी सैनिकांची (Soldier) गरज आहे आणि तो अनुभव माझ्याकडे आहे. मी घरी परतू शकलो नाही तर त्याचा मला पश्चाताप होणार नाही.'
First published:

Tags: Russia, Russia Ukraine, Russia's Putin, Ukraine news

पुढील बातम्या