जाहिरात
मराठी बातम्या / Viral / OMG! हे आहे जगातील सर्वात मोठं कुटुंब; फॅमिलीत आहेत तब्बल 2 कोटी 70 लाख नातेवाईक

OMG! हे आहे जगातील सर्वात मोठं कुटुंब; फॅमिलीत आहेत तब्बल 2 कोटी 70 लाख नातेवाईक

OMG! हे आहे जगातील सर्वात मोठं कुटुंब; फॅमिलीत आहेत तब्बल 2 कोटी 70 लाख नातेवाईक

ही आतापर्यंतची सर्वात मोठी फॅमिली ट्री (Biggest Family Tree) आहे, ज्यात 27 मिलियन म्हणजेच 2 कोटी 70 लाख लोकांचा समावेश आहे. हे सर्व दूर-दूरचे नातेवाईक आहेत, जे एकमेकांसोबत आजही जोडले गेलेले आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : आजपर्यंत तुम्ही अनेक वेगवेगळ्या कुटुंबांबद्दल ऐकलं असेल. काही कुटुंबांमध्ये 50-100 किंवा फार फार तर दीडशे लोक असले तरी हे ऐकून आपण थक्क होतो. आजकाल लोक विभक्त राहाणंच (Nuclear Family) अधिक पसंत करतात. लोकांना एकत्र कुटुंबात राहायला फारसं आवडत नाही. अशात आता यूकेमधील एका शास्त्रज्ञाने जगातील सर्वात मोठं कुटुंब शोधल्याचा दावा केला आहे. या व्यक्तीने सांगितलं की ही आतापर्यंतची सर्वात मोठी फॅमिली ट्री (Biggest Family Tree) आहे, ज्यात 27 मिलियन म्हणजेच 2 कोटी 70 लाख लोकांचा समावेश आहे. हे सर्व दूर-दूरचे नातेवाईक आहेत, जे एकमेकांसोबत आजही जोडले गेलेले आहेत. युद्ध स्मारक पाहायला गेलेली महिला; शहिदांमध्ये भावाचं नाव पाहताच…, VIDEO यूकेच्या टीमद्वारे बनवल्या गेलेल्या या फॅमिली ट्रीची मुळं 10 हजार वर्ष जुनी आहेत. ही आतापर्यंतची सर्वात जुनी आणि सर्वात मोठी फॅमिली ट्री आहे. असं म्हटलं जात आहे की याच्या मदतीने मानवाचा सुरुवातीचा प्रवास जाणून घेण्यातही मोठी मदत होईल. या जंबो फॅमिली ट्रीच्या मदतीने मेडिकल रहस्य सोडवण्याचाही प्रयत्न केला जाईल. याचे प्रिंसिपल ऑथर डॉ यान वोंग यांचं म्हणणं आहे की हे विशाल फॅमिली ट्री अनेक गोष्टींमध्ये लोकांची मदत करेल. डॉ. यान यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसोबत हा रिसर्च पूर्ण केला. या फॅमिली ट्रीमध्ये एकापाठोपाठ एक असे दूरचे नातेवाईकही जोडले गेले. हे सर्व लोक वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांसोबत रक्ताच्या नात्याने जोडले गेले होते. शेकडो वर्षांपासून जमा करण्यात आलेल्या डीएनएच्या मदतीने हे फॅमिली ट्री बनवण्यात आलं. यात अनेक कोटी लोकांचे सँपल घेऊन तपास करून हे ट्री बनवण्यात आलं. यात तब्बल 27 मिलियन लोक आहेत. या ट्रीच्या मदतीने अनेक रहस्यांचा उलगडा होईल.

घासून घासून महिलेने दातांची अक्षरशः लावली वाट; पाहून डेंटिस्टही झाले शॉक

जर्नल सायन्सने हे तंत्र प्रकाशित केलं. DNA द्वारे कौटुंबिक ट्री तयार केल्याने त्याचा परिणाम अचूक निघतो. यामध्ये टीमने आठ डेटाबेसमध्ये उपस्थित असलेल्या 3 हजार 609 मानवांच्या जनुकांचा अभ्यास केला आणि त्यांचे पूर्वज कुठे राहत होते, याचा अंदाज संगणकीय अल्गोरिदमद्वारे वर्तवला. सरतेशेवटी, ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञाने 27 दशलक्ष लोकांच्या कुटुंबांचे नेटवर्क तयार केलं. आता त्याच्या अभ्यासावर, अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. एवढ्या मोठ्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी सध्या लोक खूप उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात