मुंबई 21 जानेवारी : सुनिल शेट्टी याची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहूल लवकरच लग्नबंधणात अडकणार आहेत. 23 जानेवारीला हे दोघेही सात फेरे घेणार असल्याची बातमी समोर आली आहे. आपल्या जवळच्या लोकांच्या उपस्थीतीत दोघेही लग्न करणार आहेत.
हा विवाह सोहळा अत्यंत गुप्त ठेवण्यात आला आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळा बंगल्यात हे लग्न होणार आहे. शनिवारपासून लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. शनिवारी संध्याकाळी कॉकटेल पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्टीने प्री-वेडिंग कार्यक्रम सुरू होतील.
खंड्याळ्याच्या ज्या बंगल्यावर हे दोघेही लग्नगाठ बांधणार आहे. तो बंगला कोणाच्याही स्वप्नातल्या बंगल्यापेक्षा कमी नाही. मोठ-मोठ्या सेलिब्रिटींकडे ही नसेल असा भव्य, सुंदर आणि कॉस्टली असा बंगला आहे. शिवाय या बंगल्यात राहाताना देखील तुम्ही निसर्गाशी जोडले जाल असं त्याचं खूपच सुंदर डिझाईन आहे.
डायनिंग, बाल्कनी एरिया, स्विमिंग पूल, बाहेरचे लॉन, तसेच मिनी थिएटर अशा गोष्टी त्याच्या घरात आहेत. शिवाय खूप सारे झाड आणि वेगवेगळ्या आकाराच्या दगडांनी त्याचं घर सजवलं गेलं आहे.
आता एवढी प्रशंसा केल्यानंतर त्याचं घर कसं दिसत असेल यासाठी तुम्हाला उत्सुकता तर लागलीच असेल. मग चला स्वत: सुनिल शेट्टीसोबत आपण त्याच्या या आलिशान खंडाळ्याच्या घराची झलक पाहू जिथे त्याची मुलगी आणि केएल राहूल लग्नगाठ बांधणार आहेत.
हा व्हिडीओ खूप जूना आहे. पण तो पाहून तुम्हाला एक अंदाजा लावता येईल की किती ग्रँडपद्धतीने अथिया आणि केएल राहूलचं लग्न पार पडणार आहे.
हा व्हिडीओ यूट्यूबच्या 'व्हेअर द हार्ट इज' शोच्या एपिसोडमध्ये सुनील शेट्टीने प्रेक्षकांना त्याचे घर दाखवले. या शोमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या घरातील प्रत्येक कोपरा अन् कोपरा चाहत्यांना दाखवतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kl rahul, Social media, Sunil shetty, Top trending, Videos viral, Viral