मराठी बातम्या /बातम्या /Viral /Kitchen Jugaad : इस्त्रीची गरजच नाही, चहाच्या गाळणीने प्रेस करा कपडे; कसं ते पाहा VIDEO

Kitchen Jugaad : इस्त्रीची गरजच नाही, चहाच्या गाळणीने प्रेस करा कपडे; कसं ते पाहा VIDEO

फोटो सौजन्य - युट्यूब व्हिडीओ स्क्रिनशॉट

फोटो सौजन्य - युट्यूब व्हिडीओ स्क्रिनशॉट

चहाच्या गाळणीने कपडे कसे प्रेस करायचे, हे एका गृहिणीने दाखवलं आहे.

मुंबई, 25 मे : कपडे प्रेस करायचं म्हटलं की इस्री लागते आणि त्यासाठी लाइट लागते. पण बऱ्याचदा इस्री नसते किंवा लाईट जाते, तेव्हा कपडे प्रेस कसे करायचं असा प्रश्न पडतो. पण लाइट नसली आणि इस्री नसली तरी तुम्ही कपडे प्रेस करू शकता. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुम्ही चक्क चहाच्या गाळणीनेही कपडे प्रेस करू शकता. आता ते कसं याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

चहाची गाळणी आपण चहा गाळण्यासाठी वापरतो. पण याचा कपडे इस्री करण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो, याचा तुम्ही कधी विचारही केला होता का? पण एका गृहिणीने ते करून दाखवलं आहे. अनेक गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा चहाच्या गाळणीने कपडे इस्त्री करण्याचा जुगाड.

बऱ्याचदा असं होतं की काही वेळा आपण कपडे काही वेळापुरताच घालतो. शिवाय कपडे वारंवार धुतल्याने खराबही होतात. अशावेळी तुम्ही कपडे स्वच्छ आणि प्रेस करण्यासाठी चहाच्या चाळणीचा वापर करू शकता. आता ते कसं, ते या महिलेने व्हिडीओत दाखवलं आहे.

Kitchen Jugaad : आता कपडे धुण्याची झंझटच नाही, आपोआपच स्वच्छ होतील; कसं ते पाहा VIDEO

व्हिडीओत तिने दाखवल्यानुसार तिने आपला एक कुर्ता घेतला आहे आणि तो पसरवून ठेवला आहे. चहाची गाळणी घेऊन त्यात बेकिंग सोडा टाकला. चहाच्या गाळणीने तिने कुर्त्यावर बेकिंग सोडा पसरवून घेतला. नंतर कुर्त्यावर हलका हात फिरवला. 5-10 मिनिटं असंच ठेवून कपड्यावरून बेकिंग सोडा काढून घ्या. बेकिंग सोडा दुर्गंधी आणि अस्वच्छता दूर करण्याचं काम करतं. यानंतर तिने कुर्ता उन्हात टाकला. न धुता, न प्रेस करता तुम्ही अशा पद्धतीने कपडे स्वच्छ, प्रेस करू शकता, असा दावा या महिलेने केला आहे.

Kitchen Jugaad : Gold Jewellery लॉकरऐवजी टॉयलेटमध्ये ठेवा; काय कमाल होते ते VIDEO मध्येच पाहा

सीमा फॅमिली व्लॉग यूट्युब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत याशिवाय इस्रीशिवाय कपडे प्रेस करण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत.

" isDesktop="true" id="892028" >

या जुगाडाची हमी न्यूज 18 लोकमत देत नाही. पण तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम काय आला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

First published:
top videos

    Tags: Kitchen Jugaad, Lifestyle, Viral, Viral videos